ANNUAL PREPAID OFFER GET UNLIMITED CALLING, DATA AND SMS FOR 365 DAYS WITH ONE RECHARGE 
बिझनेस

Annual Prepaid Offer: वर्षभरासाठी करा फक्त एकदाच रिचार्ज अन् मिळवा कॉलिंग, डेटा, एसएमएसची सुविधा

Jio-Airtel-Vi-BSNL: जर वारंवार रिचार्जचा कंटाळा आला असेल, तर Jio, Airtel, Vi आणि BSNL कडून मिळवा ३६५ दिवसांसाठी वैध प्रीपेड प्लॅन, तेही ₹२,००० पेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे.

Dhanshri Shintre

बीएसएनएलचा(BSNL) १८१२ रुपयांचा प्लॅन

भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने ज्येष्ठ नागरिकांसाठी खास "सम्मान प्लॅन" सादर केला आहे. या ३६५ दिवसांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग, १०० एसएमएस आणि ६ महिन्यांसाठी बीआयटीव्ही प्रीमियम सबस्क्रिप्शन मिळते. हा प्लॅन फक्त नवीन ज्येष्ठ नागरिक वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.

एअरटेलचा(Airtel) १८४९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

एअरटेलने ३६५ दिवस वैध असलेला नवीन व्हॉइस आणि एसएमएस प्रीपेड प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनमध्ये डेटा सुविधा नाही. मात्र ग्राहकांना अमर्यादित कॉलिंग, एकूण ३६०० एसएमएस, परप्लेक्सिटी प्रो एआय सबस्क्रिप्शन, मोफत हॅलोट्यून्स आणि स्पॅम कॉल व एसएमएस अलर्टचे फायदे मिळतात.

एअरटेलचा २२४९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

एअरटेलचा हा वार्षिक प्रीपेड प्लॅन ३६५ दिवस वैध असून, ग्राहकांना एकूण ३० जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि ३,६०० एसएमएसचा लाभ मिळतो. याशिवाय, परप्लेक्सिटी प्रो एआय सबस्क्रिप्शन, मोफत हॅलोट्यून्स तसेच स्पॅम कॉल आणि एसएमएस अलर्टसारख्या अतिरिक्त सुविधा या प्लॅनमध्ये दिल्या आहेत.

वीआयचा(Vi) १८४९ चा प्रीपेड प्लॅन

वीआयने ३६५ दिवस वैध असा नवीन व्हॉइस आणि एसएसएससाठी प्रीपेड प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्ये डेटा सुविधा नाही. मात्र ग्राहकांना अमर्यादित कॉलिंग आणि एकूण ३६०० एसएमएसचा लाभ मिळतो. याव्यतिरिक्त या प्लॅनमध्ये कोणतेही अतिरिक्त फायदे किंवा सबस्क्रिप्शन सेवांचा समावेश नाही.

Vi चा २२४९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

या ३६५ दिवसांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण ३० जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि ३६०० एसएमएसचा लाभ मिळतो. जो वर्षभरासाठी उत्तम पर्याय ठरतो.

जिओचा(Jio) १७४८ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

जिओकडे सध्या ₹२,००० पेक्षा कमी किमतीत ३६५ दिवसांचा प्लॅन उपलब्ध नाही. मात्र कंपनी ₹१,७४८ किंमतीचा ३३६ दिवसांचा व्हॉइस आणि एसएमएस प्लॅन देते. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित कॉलिंग, ३,६०० एसएमएस, तसेच जिओ टीव्ही आणि जिओ एआय क्लाउडचा अॅक्सेस मिळतो. मात्र डेटा सुविधा नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 नोव्हेंबरला

दुपारी मोबाइल सील, मग रात्री ११.१३ वाजता व्हॉट्सॲपचा लास्ट सीन कसा? फिंगर लॉकद्वारे...; डॉक्टरच्या कुटुंबियांचा खळबळजनक दावा

Suryakumar Yadav: श्रेयस अय्यरची तब्येत कशीये? पत्रकार परिषदेत सूर्यकुमारने दिली महत्त्वाची अपडेट

Box Office Collection: 'थामा' आणि 'एक दीवाने की दीवानियात'मध्ये काटे की टक्कर; बॉक्स ऑफिसवर कोणी मारली बाजी?

Gold Rate Fall: धनत्रयोदशीपासून सोन्याचे दर घसरले, तब्बल ७६०० रूपयांनी झालं स्वस्त; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT