Anganwadi Bharti 2026 Saam Tv
बिझनेस

Anganwadi Bharti 2026: राज्यातील १ लाख अंगणवाड्यांमध्ये नोकरभरती; पगार, पात्रता ते अर्जाचा शेवट दिवस, जाणून घ्या सर्व माहिती

Anganwadi Bharti 2026: सोलापूर जिल्ह्यात अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या १७६ रिक्त पदांसाठी २० ते ३१ जुलैदरम्यान अर्ज मागविण्यात येणार आहेत. जाणून घ्या पात्रता, मानधन आणि भरतीचे वेळापत्रक.

Shruti Vilas Kadam

Anganwadi Bharti 2026: राज्यभरातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यभरात एकूण १,०१५ सेविका आणि ३,९२८ मदतनीस पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक भरती होणार आहे. महिला व बालविकास विभागामार्फत जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये १७६ रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. यामध्ये ६१ अंगणवाडी सेविका आणि ११५ मदतनीस पदांचा समावेश आहे. इच्छुक महिला उमेदवारांकडून २० ते ३१ जुलै या कालावधीत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तसेच, २७ ऑगस्ट रोजी अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत.

या भरतीमध्ये निवड झालेल्या अंगणवाडी सेविकांना दरमहा १३ हजार रुपये, तर मदतनीसांना ७ हजार ५०० रुपये मानधन दिले जाणार आहे.शासनाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, ३ ते ७ ऑगस्ट दरम्यान अर्जांची छाननी करून प्राथमिक गुणवत्ता यादी तयार केली जाईल. १० ते १२ ऑगस्ट या कालावधीत पडताळणी समितीकडून गुणवत्ता यादीची तपासणी केली जाईल. त्यानंतर १३ ते २६ ऑगस्ट या कालावधीत हरकती आणि आक्षेप नोंदविता येतील. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २७ ऑगस्ट रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करून निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे पाठवण्यात येतील.

अंगणवाडी सेविकांवर बालकांचे पूर्वप्राथमिक शिक्षण, गरोदर महिलांच्या आरोग्याची नोंद, पोषण आहार वितरण, बालकांच्या आरोग्याची देखरेख, पोषण ट्रॅकरवर माहिती नोंदविणे आणि शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असते. तर मदतनीस बालकांच्या शिक्षणात सहाय्य करणे, अंगणवाडीचे दैनंदिन कामकाज, वजन व उंचीच्या नोंदी ठेवणे आणि विविध योजनांच्या अंमलबजावणीत सेविकांना मदत करणे हे काम असेल.

सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट, बार्शी, वैराग, करमाळा, माढा, टेंभुर्णी, माळशिरस, अकलूज, मंगळवेढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, पंढरपूर, सांगोला, कोळा आणि दक्षिण सोलापूर या प्रकल्पांमध्ये भरती होणार आहे. त्यामुळे सरकारी सेवेत काम करण्याची इच्छा असलेल्या पात्र महिलांसाठी ही भरती मोठी संधी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत खांदेपालट होणार? बड्या नेत्याच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात उठली वावटळ

Evil Eye Remedies: दृष्ट लागली आहे हे कसं ओळखावं? कसं कराल संरक्षण?

Accident: काँग्रेसच्या स्थानिक नेत्याचा भीषण अपघात, कार तीन-चार वेळा उलटून थेट पुलाखाली कोसळली

Maharashtra News Live Update : जेजुरी अपघातातील मृतांचा आकडा वाढला

Accident News : भीषण अपघात! भरधाव ट्रकची जोरदार धडक, कारचा चेंदामेंदा; एकाच कुटुबांतील ३ जणांचा मृत्यू , २ जखमी

SCROLL FOR NEXT