AI Driverless Car Saam Tv
बिझनेस

AI Driverless Car: ड्रायव्हरशिवाय चालतेय बस; १०,००० प्रवाशांचा प्रवास; वाचा सविस्तर

AI Driverless Bus in IIT Hyderabad: आयआयटी हैदराबादमध्ये पहिली ड्रायव्हरलेस बस विकसित करण्यात आली आहे. या बसमध्ये कोणताही ड्रायव्हर नसणार आहे.

Siddhi Hande

सध्या एआय इंटेलिजेंसमुळे जग खूप पुढे गेले आहे. एआयमुळे अनेक कामे सोपी झाली आहेत. त्यानंतर आता ड्रायव्हरलेस म्हणजेच ड्रायव्हरशिवाय चालणारी बस तयार करण्यात आली आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT Hyderabad)ने हा प्रयोग केला आहे. आयआयटी हैदराबादने आपल्या कॅम्प्समध्ये Artificial Intelligence (AI)वर चालणारी बस तयार केली आहे.

AIद्वारे विकसित चालणारी ही बस ड्रायव्हरलेस असणार आहे. टेक्नोलॉजी इनोव्हेशन हब ऑन ऑटोनॉमस नेव्हिगेशन या केंद्रा ही बस तयार करण्यात आली आबे. या बस स्मार्ट मॉबिलिटीचे उत्तम उदाहरण आहे. या बसमुळे कॅम्पसमधील संपूर्ण प्रवास सोपा होणार आहे. याचसोबत Autonomous Vehicles क्षेत्रात नवे पर्व सुरु होणार आहे.

TiHAN च्या टीमने Self driving Electric Shuttles तयार केले आहे. हा प्रोजेक्ट सर्वसामान्यांसाठी काही महिन्यात खुला करण्यात येईल. १०,००० पेक्षा जास्त लोकांना या बससचा अनुभव घेतला आहे. त्यापैकी ९० टक्के लोक या बसमधून प्रवास करुन समाधानी असल्याचे सांगितले आहे.

बसची खासियत

ही ड्रायव्हरलेस बस ६ सीटर आणि १४ सीटर अशा दोन प्रकारात उपलब्ध असते. या बसमध्ये Automatic Emergency Brake, Adaptive Cruise Control आणि Sensor Technology आहे. यामुळे या बसने प्रवास करण्यासाठी सुरक्षेची नेहमी काळजी घेतली जाते. यामुळे जर तुमच्या बससमोर कोणतीही व्यक्ती किंवा वाहन आले तर बस आपोआप स्पीड कमी करते. या टेक्नोलॉजीला Technology Readiness Level (TRL)-9 प्रमाणपत्र मिळाले आहे.

हा प्रकल्प IIT कॅम्पसपरुती नव्हे तर पहिली Automatic Driving Test Track विकसित करत आहे. ही एआय चलित ड्रायव्हरलेस बस सेवा भारतातील ट्रान्सपोर्ट क्षेत्रात गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT