7/12 Satbara extract saam tv
बिझनेस

Agriculture News: जमिनीची वाटणी झाल्यानंतर सामूहिक 7/12 च्या उताऱ्यातून वेगळा उतारा कसा काढायचा? जाणून घ्या प्रोसेस

7/12 Satbara extract : अनेक ठिकाणी गावांमध्ये जमिनीचे मालक एकाहून अधिक असतात. अनेकवेळा कुटुंबांमध्ये जमिनीची वाटणी होते, पण महसूल नोंदींमध्ये वेगळी नोंद नसते.

Bharat Jadhav

बहुतांश गावांमध्ये जमिनीचे मालक एकाहून अधिक असतात. अशावेळी कुटुंबातील सदस्यांमध्ये जमिनीची वाटणी होत असते. पण महसूल नोंदी ह्या वेगळ्या केल्या नसतात. म्हणजेच काय अख्खा जमिनीचा सातबारा उतारा हा एकच राहतो. त्यामुळे वाटणी होऊनही अधिकृत कागदपत्रामध्ये प्रत्येकाचा स्वतंत्र हक्क स्पष्ट दिसत नाही. स्वतंत्र मालकी हक्क दिसत नसल्यानं ज्या व्यक्तीला जमिनीचा व्यवहार करायचा आहे, त्यांना कायदेशीर अडचणी येत असतात. त्यामुळे वाटणी झाल्यावर स्वतंत्र 7/12 उतारा काढणे गरजेचे असते.

असा मिळवा स्वतंत्र सातबारा उतारा

वाटणी झाल्यावर स्वतंत्र सातबारा उतारा काढण्याच्या प्रक्रियेला पोटहिस्सा नोंद म्हटलं जातं. सातबारा उताऱ्यामधील सर्व भागधारकांनी आपसात जमीन कोणाला किती मिळेल यावर एकमताने निर्णय घ्यावा. हा निर्णय लेखी स्वरूपात ‘वाटणी करारनामा’ (Partition Deed) म्हणून नोंदवावा. काररनामा वकिलामार्फत तयार करून नोंदणी कार्यालयात रजिस्टर्ड करावा.

त्यानंतर संबंधित तालुका कार्यालयातील महसूल विभाग किंवा ऑनलाइन महसूल पोर्टलवरून पोटहिस्सा नोंदणीसाठीी अर्ज करावा. अर्जात वाटणी झालेल्या भागांचे तपशील, वाटणीचा करार, जुना 7/12 उतारा, जमीनधारकांचे आधार/पॅन कार्ड, रहिवासी पुरावा द्यावा. अर्ज केल्यानंतर तलाठी संबंधित जमिनीची मोजणी करत असतो. तेथील सीमारेषा पाहतो आणि प्रत्यक्ष वाटणी झाल्याची खात्री तलाठीकडून केली जाते. त्यानंतर मंडळ अधिकारी अहवाल तयार करतो आणि तो अहवाल तहसीलदारांकडे पाठवत असतो.

तपासणी अहवाल आणि कागदपत्रांच्या आधारे तहसीलदार पोटहिस्सा मंजूर करत असतात. त्यानंतर महसूल नोंदींमध्ये प्रत्येक भागधारकाच्या नावाने स्वतंत्र 7/12 उतारा तयार केला जात असतो. मंजुरीनंतर संबंधित व्यक्ती महाभुलेख (Mahabhulekh) किंवा (e-Satbara) ई-सातबारा वेबसाइटवरून आपला नवीन स्वतंत्र 7/12 उतारा पाहू आणि डाउनलोड करू शकतात. फक्त त्यांच्याच नावाने मिळकतीची नोंद झालेली असते.

महत्त्वाच्या बाबी काय?

वाटणी सर्व भागधारकांच्या संमतीने झालेली पाहिजे. जर वादग्रस्त जमिनीवर पोटहिस्सा नोंद होत नाही.

जमिनीवर जर कोणत्याही प्रकारचा कायदेशीर वाद, बंधन किंवा कर्ज असेल, तर ते आधी निकाली काढावे लागते.

नगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या जमिनींसाठी स्थानिक प्राधिकरणाची मान्यता घ्यावी लागते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच गोविंदचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

Government Employee Pension : सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर! आता २० वर्षाच्या सेवेवर मिळणार पेन्शन

Crime News: मीरा रोडमधील ड्रग्स प्रकरणाचं हैदराबाद कनेक्शन; ५००० कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त, मीरा भाईंदर पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT