बिझनेस

Pulses Rate Increase: आधी टोमॅटो लालबूंद, आता चणाही टम्म फुगला; महागाईनं बिच्चारी जनता बेजार

Chana Price Rise In Festival : टोमॅटो, कांदा आणि मसाल्यांचे भाव वाढल्यानंतर डाळीही महागल्यानं सर्वसामान्य बेजार झाले आहेत.

कोमल दामुद्रे

Chana Price News : गेल्या काही आठवड्यांत झालेल्या घसरणीनंतर चणा पुन्हा महागला आहे. टोमॅटो, कांदा आणि मसाल्यांचे भाव वाढल्यानंतर डाळीही महागल्यानं सर्वसामान्य बेजार झाले आहेत. ऐन सण-उत्सवाच्या तोंडावर महागाई नियंत्रणात आणून जनतेचा रोष कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारची मात्र डोकेदुखी वाढली आहे.

गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. टोमॅटोचा भाव भडकला असल्यामुळं सर्वसामान्य नागरिक सरकारवर चिडले आहेत. किरकोळ बाजारात टोमॅटोनं कमालीचा भाव खाल्ला. २४२ रुपये किलोनं विकला गेला. मात्र, आता इतर डाळींसोबतच चणाही महागला आहे.

तुरडाळ आणि उडीदसह इतर डाळींच्या (Pulses) तुलनेत चणा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळं चण्याचे दर नियंत्रणात आणले जाऊ शकतात, असं मानलं जातं. व्यापार आणि बाजारपेठांतील (Market) सूत्रांनुसार, साधारणपणे ३.५ ते ३.६ दशलक्ष टन चणा उपलब्ध आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

बऱ्याच काळानंतर चणा २०२३ - २४ मध्ये किमान आधारभूत किंमतीच्या (MSP) 5335 रुपये प्रतिक्विंटल भावाने विकला जात आहे. चण्याला चांगला भाव मिळत असला तरी, याचा शेतकऱ्यांना किती लाभ होतो, हा प्रश्न कायमच आहे, असे बोलले जात आहे. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सण-उत्सवांच्या तोंडावर मागणी वाढली असून, त्या तुलनेत साठा कमी आहे. परिणामी भाव वाढत आहे.

व्यापारांच्या मते, तुरडाळ आणि उडीद या दोन डाळींच्या तुलनेत चण्याला चांगला भाव मिळत आहे. खाजगी व्यापाराकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, १ जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान देसी चणाच्या दरात १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर काबुली चणाच्या दरात १४ ते २९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचकाळात बेसनच्या (Besan) दरात १० ते १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरम्यान दिल्लीच्या बाजारपेठांमध्ये चणाच्या घाऊक किंमतीत सुमारे ११.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. म्हणजेच ५,७५० रुपये प्रतिक्विंटलवरून ६,४०० रुपये इतका वाढला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Russia Earthquake : रशियात ८.७ रेश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप, त्सुनामीचा इशारा, हादरवणारा व्हिडिओ समोर

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे पैसे लाटणाऱ्या १४००० भावांकडूनही वसुली, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Post Office ची धांसू योजना, नवरा-बायकोने एकत्र करा गुंतवणूक; ५ वर्षांत मिळतील १३ लाख रुपये

वर-वधूच्या नातेवाइकांचा धडाकेबाज डान्स! 'लड़की तुम्हारी कुंवारी रह जाती'वर मांडवात रंगला जल्लोष; VIDEO

Maharashtra Live News Update: गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून २,५०० जादा एसटी बस , ४०० गाड्या फुल

SCROLL FOR NEXT