बिझनेस

Gautam Adani: उद्योगपती गौतम अदानी यांची मोठी घोषणा, लवकरच समुहाचे अध्यक्षपद सोडणार; कोट्यवधींचा कारभार कोण सांभाळणार?

Gautam Adani Retirement Plan: अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी सेवानिवृत्त होणार असल्याचे सांगितले आहे. येत्या काही वर्षात ते निवृत्त होणार असून कंपनीची जबाबदारी मुलांवर सोपवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Siddhi Hande

देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणजे गौतम अदानी. अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी आपल्या निवृत्तीची योजना आखली आहे. ते लवकरच सेवानिवृत्ती घेणार असल्याचे बोलले जात आहे. येत्या काही वर्षात ते त्यांच्या कंपनीची जबाबदारी नवीन पिढीकडे सोपवणार आहे. ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत गौतम अदानींनी याबाबत माहिती दिली आहे.

६२ वर्षीय गौतम अदानी यांनी सेवानिवृत्ती घेण्याचा विचार केला आहे. २०२३० पर्यंत ते त्यांच्या कंपनीची जबाबदारी त्यांचा मुलगा आणि पुतण्याकडे सोपवतील. गौतम अदानी यांनी वयाच्या ७० व्या वर्षी सेवानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे, असं सांगण्यात येत आहे. गौतम अदानी आता ६२ वर्षांचे आहेत. त्यामुळे पुढील ७-८ वर्षात ते निवृत्ती घेतील, असं बोललं जात आहे.

गौतम अदानींनी मुलाखतीत सांगितले की, २०३० पर्यंत ते अदानी समुहाचे अध्यक्षपद सोडणार आहे. त्यानंतर कंपनीची जबाबदारी दोन मुले आणि पुतण्यांकडे सोपवणार आहे. याबाबत एका अहवालात सांगितले की, त्यांच्या कंपनीचे चार वारसदार असतील. मुलगा करण आणि जीत अदानी आणि पुतणे प्रणव आणि सागर अदानी हे अदानी कुटुंब ट्रस्टची जबाबदारी सांभाळतील. ते या कंपनीचे समान लाभार्थी असतील.

अहवालानुसार, अदानी कंपनीमध्ये कोण कोणती जबाबदारी घेणार याबाबत गोपनीय करार केला जाईल. ज्यामध्ये कंपन्यांमधील स्टेक आणि उत्तराधिकाऱ्यांबाबत सर्व माहिती असेल. सध्या गौतम अदानींचा मुलगा करण अदानी हा अदानी पोर्टचा व्यवस्थापकीय संचालक आहे तर लहान मुलाग जीत हा अदानी पोर्टचे संचालक आणि सागर अदानी कार्यकारी संचालक आहे.

गौतम अदानींच्या निवृत्तींतर अदानी समुहाचा अध्यक्ष कोण होणार?

अहवालानुसार, गौतम अदानींच्या निवृत्तींतर अदानी समुहाचा अध्यक्ष कोण होणार याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. परंतु करण आणि प्रणव अदानी हे या पदासाठी दावेदार असतील, असं सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Car Accident: भरधाव कारची उभ्या असलेल्या वॅगनआर कारला धडक, टक्कर होताच दोन्ही वाहनांनी घेतला पेट, ५ जणांचा मृत्यू

विधान भवनातील दलालांवर शासनाचा डोळा; शासनाच्या परिपत्रकामुळे दलालांना चाप?

वैद्यकीय चाचणीत कॅन्सर झाल्याचं समजलं; कंपनीनं कर्मचाऱ्याला थेट कामावरुन काढलं, पुण्यातील संतापजनक प्रकार

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा राजकीय भूकंप? ठाकरे-पवारांचे आमदार फुटणार? VIDEO

Thursday Horoscope : सोनं, पैशांचं घबाड हाती लागणार; ५ राशींचे लोक डाव साधणार

SCROLL FOR NEXT