Adani Group news Adani group
बिझनेस

Adani Group : अदानींच्या कंपनीला आयकर विभागाचा दणका; ठोठावला तब्बल २३ कोटींचा दंड, नेमकं प्रकरण?

Adani Group news : अदानी कंपनीला आयकर विभागाने दणका दिलाय. त्या कंपनीला २३ कोटींचा दंड ठोठावला आहे.

Vishal Gangurde

गौतम अदानी समूहाची कंपनी एसीसी लिमिटेडवर आयकर विभागने मोठी कारवाई केली आहे. आयकर विभागने एसीसी लिमिटेडवर एकूण २३.०७ कोटी रुपयांचा वेगवेगळा दंड ठोठावला आहे. विभागाने २०१५ -१६ या आर्थिक वर्षात उत्पन्नाची माहिती चुकीची सादर केल्या प्रकरणी १४.२२ कोटी रुपये दंड ठोठवण्यात आला आहे. तर २०१८-१९ या आर्थिक वर्षात उत्पन्नाची माहिती सादर केल्याप्रकरणी ८.८५ कोटी रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे. अदानी समूह अपील प्राधिकरणांसमोर या दंडाला आव्हान देणार आहे.

एसीसीने शेअर बाजाराला दिलेल्या सूचनेत सांगितलं की, कंपनी हीआयकर आयुक्तांच्या समोर अपील दाखल करत दोन्ही आदेशांचा विरोध करणार आहे. या अपीलाअंतर्गत लावण्यात आलेल्या दंडावर स्थगिती देण्याची मागणी करणार आहे. कंपनीला दंडाची नोटीस एक ऑक्टोबर २०२५ रोजी मिळाली. या दंडामुळे कंपनीच्या कामकाजावर कोणताही परिणाम होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

एसीसी ही अंबुजा सीमेंटची उपकंपनी आहे. अंबुजा सीमेंटजवळ ५० टक्के शेअर आहेत. अदानी समूहाने सप्टेंबर २०२२ मध्ये स्वित्झर्लंडच्या होल्सिम समूहासोबत 6.4 अब्ज अमेरिकी डॉलरचा व्यवहार केला होता. त्यावेळी स्वित्झर्लंडच्या होल्सिम समहूसोबत ६.४ अब्ज अमेरिकी डॉलरच्या व्यवहारात अंबुजा सिमेंट्स आणि तिची उपकंपनी एसीसी लिमिटेडचे अधिग्रहण केले होते.

एससीसी लिमिटेडच्या शेअर १८२९.२० रुपयांच्या या मागील क्लोजिंगच्या तुलनेत १८५१.४० रुपयांपर्यंत पोहोचला. हा शेअर आता २,५१६.३० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या शेअरने ५२ आठवड्यांची उचांकी पातळी गाठली हेच. या वर्षीच्या मे महिन्यात शेअरने १७७५.०५ रुपयांचा निचांकी स्तर गाठला होता. त्यावेळी शेअरने ५२ आठवड्यांची निचांकी पातळी गाठली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : पुण्यातील कुख्यात गुंडाची बड्या राजकीय नेत्यांसोबत उठबस? अनेक व्हिडिओ समोर; राजकीय वर्तुळात खळबळ

Food Delivery Robot: पिझ्झापासून किराणापर्यंत सर्व काही घरपोच; रोबो करणार सुरक्षित डिलिव्हरी

Maharashtra Live News Update: तांत्रिक बिघाडामुळे मेट्रोसेवा उशिराने सुरु

Shocking : धक्कादायक! पाणीपुरी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Kidnapping : निर्जन रस्ता, मिट्ट काळोख, ट्रक रिव्हर्स घेतला; ड्रायव्हरनं महिलेला उचललं अन्..; अपहरणाचा थरारक Video

SCROLL FOR NEXT