Adani and Google Deal Saam Tv
बिझनेस

Adani and Google Deal: अदानींचा गुगलशी मोठा करार, आता 'या' क्षेत्रात एकत्र करणार काम; जाणून घ्या सविस्तर माहिती

Adani Group News : अदानी समूह आणि गुगलमध्ये मोठा करार झाला आहे. काय आहे हा करार, याचबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ...

Satish Kengar

अदानी समूहाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. अदानी समूहाने आघाडीची टेक कंपनी गुगलसोबत मोठा करार केल्याची बातमी समोर येत आहे. हा करार क्लीन एनर्जीबाबत (Clean Energy) असल्याचं समजतं आहे.

या कराराद्वारे अदानी समूह गुजरातमधील खवरा येथील जगातील सर्वात मोठ्या अक्षय ऊर्जा प्रकल्पात असलेल्या नवीन सौर-पवन संकरित प्रकल्पातून (Renewal Energy Plant) क्लीन एनर्जी पुरवठा करेल. हा नवीन प्रकल्प 2025 च्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत सुरु होऊ शकतो. याचबाबत माहिती देताना गुगलने 'गुगल फॉर इंडिया' कार्यक्रमात याची घोषणा केली. तर अदानी समूहाने एका निवेदनात याबाबत सविस्तर माहिती दिली.

अदानी समूहाने काय दिली माहिती?

याबाबत माहिती देताना अदानी समूहाने सांगितलं आहे की, "या भागीदारीद्वारे, अदानी समूह गुजरातमधील खवरा येथील जगातील सर्वात मोठ्या अक्षय ऊर्जा प्रकल्पात असलेल्या नवीन सौर-पवन संकरित प्रकल्पातून क्लीन एनर्जीचा पुरवठा करेल.'' या नवीन प्रकल्पाचे व्यावसायिक ऑपरेशन्स 2025 च्या तिसऱ्या तिमाहीत सुरू होण्याची शक्यता आहे. हा करार गुगलच्या 24/7 कार्बन-मुक्त ऊर्जा उद्दिष्टे पुढे नेण्यास मदत करेल आणि भारतातील क्लीन एनर्जीसह त्याच्या क्लाउड सेवांना पुढे नेहण्यास मदत करेल, असं सांगण्यात येत आहे.

अदानी समूहाच्या या शेअर्समध्ये घसरण

दरम्यान, आज गुरुवारी शेअर बाजार 1500 अंकांनी घसरला आहे. यातच अदानी समूहाचे शेअर्सही घसरले आहेत. अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स इंट्राडे ट्रेडिंगमध्ये जवळजवळ 5 टक्क्यांनी घसरून 1869.25 रुपयांवर ट्रेंड करत होते. तर अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये 3 टक्क्यांपर्यंत घसरण झाली असून हा शेअर इंट्राडे 3102.95 रुपयांवर ट्रेंड करत आहे.

अदानी पॉवरचे शेअर्स 3 टक्क्यांपेक्षा जास्त घसरले आहेत आणि 633.10 रुपयांवर ट्रेंड करत आहेत. अदानी एनर्जी सोल्युशन्सचे शेअर्स 3 टक्क्यांपेक्षा जास्त घसरले आहेत आणि कंपनीचे शेअर्स 1039 रुपयांवर ट्रेंड करत आहेत. याशिवाय अदानी टोटल गॅस, अदानी पोर्ट आणि अदानी विल्मारच्या शेअर्समध्ये 3 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT