Stock Market Today : इराण-इस्त्रायल युद्धामुळे शेअर बाजार कोसळला; गुंतवणुकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले

Share Market News Today : इराण आणि इस्रायलमधील संघर्ष आणखीच तीव्र झाल्यास शेअर बाजारात आणखी घसरण होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
इराण-इस्त्रायल युद्धामुळे शेअर बाजार कोसळला; गुंतवणुकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले
Stock Market Fell After iran israel warSaam Tv
Published On

इराण-इस्रायलमधील युद्धाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला. आज गुरुवारी (ता. ३) शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीने झाली. BSE सेन्सेक्स 1264.20 अंकांनी घसरून 83,002.09 वर उघडला. दुसरीकडे निफ्टीतही तब्बल 344.05 अंकांची घसरण झाली. बँक निफ्टीही मोठ्या घसरणीवर उघडला आहे. सुरुवातीच्या सत्रात अनेक बँकांचे शेअर्स कोसळले आहेत.

इराण-इस्त्रायल युद्धामुळे शेअर बाजार कोसळला; गुंतवणुकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले
Gold Rate Hike : नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्याला झळाळी; वाचा प्रति तोळ्याचा भाव काय?

त्यामुळे अवघ्या काही मिनिटातच गुंतवणुकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले आहेत. अजूनही शेअर्समध्ये घसरण सुरूच आहे. BSE वर सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल जवळपा 6 लाख कोटी रुपयांनी घसरून 469.23 लाख कोटी रुपयांवर आले आहे. इराणने इस्रायलवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागल्यानंतर पश्चिम आशियात तणाव वाढण्याची भीती वाढली आहे.

इराण आणि इस्रायलमधील संघर्ष आणखीच तीव्र झाल्यास या प्रदेशातून होणारा तेलाचा पुरवठा देखील विस्कळीत होऊ शकतो. गुरुवारी याचा परिणाम जाणवू लागला असून कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ दिसून आली आहे. भारत हा कच्च्या तेलाची आयात करणारा सर्वात मोठा देश आहे. अशातच कच्चा तेलाची कमतरता भासल्यास इंधनाच्या किंमतीत वाढ होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

शेअर बाजारात घसरण सुरुच

दरम्यान, गुरुवारी बाजार उघडताच शेअर बाजारात घसरण सुरुच होती. सकाळी 10.16 वाजता, बीएसई सेन्सेक्स 83,002 वर व्यवहार करत होता. तर निफ्टी 25,452 वर आला. सेन्सेक्स समभागांबद्दल बोलायचे तर, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एम अँड एम, एल अँड टी आणि भारती एअरटेलचे शेअर्स निर्देशांकाच्या घसरणीत आघाडीवर होते.

त्याच वेळी, जेएसडब्ल्यू स्टील आणि टाटा स्टील हेच समभाग वाढीसह उघडले. मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षाच्या चिंतेमुळे निफ्टी तेल आणि वायू निर्देशांक सुरुवातीच्या व्यापारात 1.2% पेक्षा जास्त घसरला. हिंदुस्थान पेट्रोलियम, आयओसी आणि जीएसपीएल निर्देशांकात सर्वात जास्त पिछाडीवर होते. दरम्यान, भारत VIX 8.9% ने 13.06 वर गेला.

इराण-इस्त्रायल युद्धामुळे शेअर बाजार कोसळला; गुंतवणुकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना १५०० नाही तर आता ३००० मिळणार? मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य चर्चेत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com