Money Shortage Fact Check Saam Tv
बिझनेस

दिवाळीत १०, २० आणि ५० च्या नोटा मिळणार नाहीत, पैशांचा तुटवडा भासणार? RBI ने दिली महत्वाची अपडेट

Money Shortage Fact Check: दिवाळीमध्ये १०-२० आणि ५० रुपयांच्या नोटांचा तुटवडा निर्माण होणार अशी पोस्ट व्हायरल होत आहे. आरबीआयने याबाबत महत्वाची माहिती दिली.

Priya More
  • दिवाळीत १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांचा तुटवडा असणार

  • सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय पोस्ट

  • आरबीआयने ही व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे सांगितले

दिवाळी सण काही दिवसांवर येऊ ठेपला आहे. दिवाळीनिमित्त सर्वजण जोरदार खरेदी करत आहेत. बाजारामध्ये खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे. दिवाळीत मिठाई, कपडे आणि घरगुती वस्तू खरेदीसाठी रोख रक्कम दिली जाते. अशातच सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे त्यामुळे ग्राहक चिंतेत आले आहेत. या मेसेजद्वारे असा दावा केला जात आहे की, दिवाळीमध्ये १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटा मिळणार नाहीत. या नोटांचा तुटवडा आहे. ऐवढेच नाही तर नागरिकांना युपीआय आणि कार्डद्वारे पेमेंट करण्याचा सल्ला या पोस्टद्वारे दिला जातोय. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर आता आरबीआयने त्यामागचे सत्य सांगितले आणि ग्राहकांना दिलासा दिला आहे.

व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणाऱ्या या पोस्टमध्ये आरबीआयचे परिपत्रक असल्याचे दिसत आहे. त्यामध्ये देशभरात १०, २० आणि ५० सारख्या लहान मूल्यांच्या नोटांचे अवमूल्यन केले जाईल. यात नोटांच्या तुटवड्याची कारणेही स्पष्ट केली आहेत. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये सध्या संभ्रमाचे वातावरण आहे. खरंच १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटा मिळणार नाही का? असा प्रश्न त्यांना पडला आहे. कारण किरकोळ वस्तू खरेदी करताना १०-२० आणि ५० रुपयांच्या नोटांचा जास्त वापर केला जातो. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर आता आरबीआयने नेमकं काय सांगितले आहे ते आपण जाणून घेणार आहोत...

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांचा तुटवडा निर्माण होईल आणि त्यामुळे दिवाळीत मोठ्या समस्या निर्माण होतील. व्हायरल पोस्टमधील फोटोवर आरबीआयचे नाव, लोगो आणि आरबीआय गव्हर्नरची सही देखील आहे. या पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की, सरकारच्या कॅशलेस समाजाच्या संकल्पनेनुसार लहान मूल्यांच्या नोटांची छपाई हळूहळू कमी केली जात आहे. ग्राहकांना यूपीआय, कार्ड आणि नेट बँकिंग यांसारख्या डिजिटल पेमेंट पद्धती वापरण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.

या व्हायरल पोस्टनंतर पीआयबी फॅक्ट चेकने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून ही व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे सांगितले. ही पोस्ट दिशाभूल करणारी असून यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नका असा सल्ला दिला जात आहे. पीआयबीने म्हटले आहे की, दिवाळीपूर्वी आरबीआयने नवीन १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांचा तुटवडा जाहीर केल्याचा दावा करणारा व्हॉट्सअॅपवर फिरणारा संदेश खोटा आहे. महत्वाचे म्हणजे, आरबीआयने नोटांच्या उपलब्धतेबाबत अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा खोट्या दाव्यांपासून सावध राहणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : उल्हासनगरच्या पेनिन्सुला पार्क इमारतीत आग

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! जिरायतीसाठी हेक्टरी 11 हजार,बागायतदारांना मिळणार 22 हजार; केंद्र सरकारनं मदतीचे निकष बदलले

कल्याणमधील संतापजनक घटना: पैशांच्या वादातून नराधम पतीने पत्नी आणि ५ वर्षांच्या चिमुकल्यावर फेकले उकळते मटण

Gold Price Today : दिवाळीपूर्वी ग्राहकांसाठी गुड न्यूज! चांदी तब्बल २ हजारांनी स्वस्त, पाहा सोन्याचे दर

आमदारांच्या नाराजीनंतर आता राजीनामा सत्र सुरू; खासदाराचा तडकाफडकी राजीनामा, NC ला मोठा धक्का

SCROLL FOR NEXT