Pan-Aadhaar Link Saam Tv
बिझनेस

Aadhar-Pan Card Link: आधार-पॅन कार्ड लिंक नसलेल्या नागरिकांकडून ६०० कोटींचा दंड वसूल, आणखी ११ कोटी नागरिकांवर होऊ शकते कारवाई

Aadhar-Pan Card Link: सरकारने आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. आधार आणि पॅन कार्ड लिंक केल्याने अनेक कामे सोपी होतात. आधार-पॅन कार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत संपली असून त्यावर आता दंड आकारला जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Aadhar-Pan Card Link Deadline:

सरकारने आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. आधार आणि पॅन कार्ड लिंक केल्याने अनेक कामे सोपी होतात. त्यामुळे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणे गरजेचे आहे. आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत संपली असून आता आधार आणि पॅन कार्ड लिंक केल्यास दंड भरावा लागत आहे.

आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख ३० जून २०२३ होती. जर कोणी ३० जून २०२३ नंतर आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केले तर त्याला दंड भरावा लागला आहे. सरकारने आतापर्यंत जवळपास कोट्यवधींचा दंड आकारला आहे. (Latest News)

आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत संपली असून अजूनही ११.४८ कोटी पॅन कार्ड आधाप कार्डशी जोडले गेले नाहीत. त्यामुळे या लोकांकडून दंड आकारले गेले आहेत.

३० जून २०२३ नंतर पॅन-आधार लिंक केल्यानंतर त्या व्यक्तींना १ हजार रुपयांचा दंड भरावा लागतो. १ जुलै २०१३ ते ३१ जानेवारी २०२४ पर्यंत आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केलेल्या नागरिकांकडून तब्बल ६०१.९७ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

आयकर विभागाने याबाबत माहिती दिली आहे, जर करदात्यांनी त्यांचे आधार कार्ड पॅनशी लिंक केले नाही तर ते १ जुलै २०२३ पासून निष्क्रिय होईल. या पॅन कार्डवर कोणताही परतावा दिला जाणार नाही. त्यामुळे १ हजार रुपयांचा दंड भरुन तुम्ही आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करु शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

Pune: काय रे तुम्हाला मस्ती आली आहे का? लोखंडी रॉड अन् दगडाने मारहाण; पुण्यात भरचौकात टोळक्यांचा राडा, VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Beed News : बांधकाम करताना तोल गेला अन् आक्रीत घडलं, बीडमध्ये २५ वर्षांच्या तरूणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT