Aadhar Card Linking Aadhar Card Linking - Saam Tv
बिझनेस

Aadhar Card Linking: तुमच्या आधार कार्डला कोणते बँक खाते लिंक आहे? कसे कळले? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

Linking Aadhaar Card: आपल्यापैकी अनेकांकडे एकपेक्षा जास्त बँक खाते असतात. त्यामुळे नेमके कोणते खाते आधार कार्डशी लिंक आहे समजत नाही.

कोमल दामुद्रे

Aadhar Card Link Bank Account:

आधार कार्ड प्रत्येक भारतीय नागरिकांच्या ओळखपत्रांचे काम करते. हे कार्ड एखाद्या महत्त्वाच्या डॉक्यूमेंटसारखे आहे. मोबाइलच्या सिम कार्डपासून ते एखादे सरकारी काम करण्यापर्यंत याचा वापर होतो.

मोबाइलचे (Mobile) सीम कार्ड घ्यायचे असेल, रेशन कार्ड घ्यायचे असेल, एखादी गाडी घ्यायची असेल, बँकेत खाते उघडायचे असेल, एखादे सरकारी काम करायचे असेल किंवा अगदी आपली स्वतःची ओळख देखील सांगायची असेल तरी आपल्याला आधार कार्डची आवश्यकता असतेच. आधार कार्ड हे बँकेशी देखील लिंक करण्याचे अनिवार्य केले आहे. त्यामुळे विविध सरकारी योजना आणि इतर गोष्टींचा लाभ घेता येणार नाही. आपल्यापैकी अनेकांकडे एकपेक्षा जास्त बँक खाते असतात. त्यामुळे नेमके कोणते खाते आधार कार्डशी लिंक आहे समजत नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

RBI च्या नियमांनुसार जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त बँक खाती (Bank Account) असतील तर तुम्ही फक्त एक बँक खाते तुमच्या आधार कार्डशी (Aadhar Card) लिंक करु शकता. यासाठी तुम्ही UIDAI च्या Myadhaar पोर्टलला भेट देऊ शकता. त्यावरुन तुम्हाला तुमचे कोणते बँकेचे खाते लिंक आहे हे कळेल.

1. प्रोसेस काय?

  • सर्वात आधी तुम्हाला My Aadhaar च्या वेबसाईटवर (Websites) जा.

  • यानंतर 'लॉग इन' वर क्लिक करा.

  • त्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाकून कॅप्चा भरा.

  • ओटीपी आल्यानंतर पुढच्या प्रोसेसला सुरुवात होईल.

  • स्क्रीनवर एक नवीन वेबपेज उघडले ज्यानंतर तुम्हाला बँक सीडिंग स्टेटसच्या नावावर क्लिक करावे लागेल.

  • त्यानंतर तुमचे कोणते बँक खाते आधारशी लिंक आहे. याची संपूर्ण माहिती मिळेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baba Siddique Case : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, गोळीबारानंतर आरोपी लीलावती रुग्णालयात गेलेला

DA Hike: केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात १२ टक्क्यांनी वाढ, तुमचा पगार किती होणार?

Samantha Prabhu: 'मला आई व्हायचंय...' घटस्फोटाच्या ३ वर्षांनंतर अभिनेत्रीची मातृत्वाची इच्छा

Maharashtra Election : कोणत्या जिल्ह्यात किती उमेदवार, महिला उमेदवाराची संख्या सर्वाधिक कुठे?

Viral Video: अबब! जेवणाचा थाट पाहून डोळे विस्फारतील, दक्षिण भारतातील व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT