GOOGLE WALLET AADHAAR FEATURE: INDIA GETS SECURE DIGITAL ID SUPPORT Saam Tv
बिझनेस

Aadhar Card : आधार कार्ड आता खिशात ठेवण्याची गरज नाही! गुगलने आणलं नवं फिचर; जाणून घ्या माहिती

Aadhar Card Linked Google News : Google Wallet मध्ये आधार डिजिटल आयडी सपोर्ट सुरू. आता फिजिकल कार्डची गरज नाही, सुरक्षित आणि सोपी ओळख पडताळणी. गुगलचा मोठा निर्णय.

Alisha Khedekar

  • आधार कार्ड आता गुगलशी लिंक होणार

  • फिजिकल आधार कार्डची गरज कमी

  • Selective disclosure मुळे प्रायव्हसी सुरक्षित

  • UIDAI च्या सहकार्याने विकसित फीचर

  • विविध सेवांमध्ये सोपी ओळख पडताळणी

तुमचं आधार कार्ड आता गुगलशी लिंक होणार! होय, तुम्ही वाचताय ते अगदी खरं आहे. डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी गूगलने भारतात एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. गूगल वॉलेटच्या माध्यमातून आता आधार-आधारित डिजिटल आयडी सपोर्ट सुरू करण्यात आला आहे. या नव्या सुविधेमुळे यूझर्सना आपली आधार माहिती सुरक्षितपणे मोबाईलमध्ये स्टोअर करता येणार असून, फिजिकल आधार कार्ड सोबत घेऊन फिरण्याची गरज भासणार नाही.

ही सुविधा यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) च्या सहकार्याने विकसित करण्यात आली आहे. गूगल वॉलेटमध्ये आधार जोडल्यावर यूझर्सना आपली ओळख सुरक्षित आणि नियंत्रित पद्धतीने वापरता येणार आहे. या फीचरची सर्वात खास बाब म्हणजे, ओळखपत्रासाठी संपूर्ण आधार कार्ड न दाखवता केवळ आवश्यक माहिती देणे शक्य होते. 

या प्रणालीमध्ये ‘व्हेरिफायबल क्रेडेंशियल’ मॉडेलचा वापर करण्यात आला आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, एखाद्या ठिकाणी वयाचा पुरावा द्यायचा असल्यास फक्त वयाशी संबंधित माहितीच शेअर करता येईल. त्यामुळे आधार क्रमांक किंवा इतर संवेदनशील माहिती सुरक्षित राहते. यामुळे यूझर्सची खासगी माहितीचे संरक्षण अधिक प्रभावीपणे होते.

गूगलच्या माहितीनुसार, हे फीचर जागतिक सुरक्षा मानकांवर आधारित असून, ‘सेलेक्टिव्ह डिस्क्लोजर’ सारखी सुविधा यात देण्यात आली आहे. म्हणजेच यूझर स्वतः ठरवू शकतो की कोणती माहिती कोणासोबत शेअर करायची आहे. या डिजिटल आयडीचा वापर विविध सेवांमध्ये करता येणार आहे. उदाहरणार्थ, PVR INOX मध्ये चित्रपट पाहताना ओळख पडताळणी, Bharat Matrimony वर प्रोफाइल व्हेरिफिकेशन, Atlys वर व्हिसा अर्ज भरणे किंवा MyGate वर व्हिजिटर व्हेरिफिकेशन यांसारखी ऑनलाईन कामे अधिक सोपी आणि जलद होणार आहेत.

गूगलने पुढे सांगितले की, भविष्यात आणखी अनेक सेवा या प्रणालीला स्वीकारतील. भारताबरोबरच सिंगापूर, तैवान आणि ब्राझिलसारख्या देशांमध्येही डिजिटल आयडी फीचर विस्तारले जात आहे. या उपक्रमामुळे डिजिटल ओळख अधिक सुरक्षित, सोपी आणि विश्वासार्ह बनण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कडाक्याच्या उन्हात IMD ने दिली गारेगार बातमी; 12 पेक्षा अधिक राज्यांमध्ये पाऊस कोसळणार

पोट साफ न होण्याची समस्या वारंवार जाणवतेय? महिलांना असू शकतो 'या' गंभीर आजाराचा धोका

ठुशी, बुगडी अन् कोल्हापुरी हार; प्राजक्ता माळीच्या 'प्राजक्तराज' ब्रँडमध्ये कोणकोणते दागिने आहेत? पाहा लिस्ट

Dhule Tourism: धुळ्यात या किल्ल्यावर आहेत इतिहासाच्या पाऊलखुणा; विकेंड ट्रिपसाठी ठरतो उत्तम पर्याय

Sayali Sanjeev: सायली संजीवचं मनमोहक सौंदर्य पाहून व्हाल घायाळ

SCROLL FOR NEXT