Aadhaar email update META AI
बिझनेस

Aadhaar Email Update : आधार कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी! 'ही' सेवा 31 डिसेंबरपर्यंत फ्री, आताच करून घ्या नाहीतर...

Aadhaar Card Update: आधार कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. आधारमधील ईमेल आयडी अपडेट किंवा बदलण्याची सुविधा ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत मोफत उपलब्ध असून Aadhaar Mobile App च्या मदतीने घरबसल्या अपडेट करता येणार आहे.

Sakshi Sunil Jadhav

आधार कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आधारमध्ये ईमेल आयडी अपडेट करायचा असेल किंवा जुना ईमेल बदलायचा असेल तर आता त्यासाठी शुल्क द्यावं लागणार नाही. UIDAI ने आधारधारकांना दिलासा देत ईमेल अपडेटची सुविधा ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत मोफत उपलब्ध करून दिली आहे.

आधी आधारमध्ये ईमेल आयडी किंवा संबंधित तपशील अपडेट करण्यासाठी फी घेतली जायची. आता नवीन डिजिटल सुविधेमुळे नागरिकांना हे काम घरबसल्या मोबाईलच्या माध्यमातून करता येणार आहे. त्यामुळे आधार सेवा केंद्रात जाण्याची गरज कमी होणार असून वेळ आणि मेहनतही वाचणार आहे.

Aadhaar Mobile App मधून होणार ईमेल अपडेट

UIDAI च्या नव्या Aadhaar Mobile App च्या माध्यमातून आधारशी संबंधित विविध सेवा डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये ईमेल आयडी अपडेट करण्याची सुविधांचा यात समावेश आहे. युजर्सना अॅपवर लॉगिन करून आवश्यक पडताळणी प्रोसेस पूर्ण केल्यानंतर आपला नवीन ईमेल आयडी अपडेट करता येईल.

ईमेल आयडी अपडेट करणं का महत्त्वाचं?

आज बँकिंग, विमा, सरकारी योजना आणि ऑनलाइन व्हेरिफिकेशनसह अनेक सेवांमध्ये ईमेलचा वापर केला जातो. आधारशी योग्य ईमेल आयडी लिंक असेल तर महत्त्वाचे अपडेट आणि नोटिफिकेशन वेळेवर मिळायला मदत होते. जुना किंवा चुकीचा ईमेल आयडी असल्यास काही महत्त्वाची माहिती मिळण्यात अडचण येऊ शकते.

Aadhaar App वरून ईमेल कसा अपडेट कराल?

सर्वात आधी स्मार्टफोनमध्ये UIDAI चे अधिकृत Aadhaar Mobile App डाउनलोड करा. त्यानंतर आधार क्रमांकाच्या मदतीने लॉगिन करून उपलब्ध पडताळणी प्रक्रिया पूर्ण करा. पुढे Update Email किंवा संबंधित Aadhaar Details अपडेट करण्याचा पर्याय निवडा. नवीन ईमेल आयडी नोंदवून माहिती तपासा आणि रिक्वेस्ट सबमिट करा. रिक्वेस्ट सबमिट केल्यानंतर Service Request Number (SRN) मिळेल. या क्रमांकाच्या मदतीने अपडेट रिक्वेस्टची स्थिती ट्रॅक करता येईल.

त्यामुळे आधारमध्ये ईमेल आयडी अपडेट न केलेल्या किंवा जुना ईमेल बदलू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी ३१ डिसेंबर २०२६ पर्यंतची मोफत सुविधा महत्त्वाची ठरू शकते. अपडेट करण्याआधी UIDAIच्या अधिकृत अॅप किंवा वेबसाईटवरच्या ताज्या सूचनांची खात्री करणं योग्य ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime: माझ्या एरियात धंदा करायचा असेल तर...; कल्याणमध्ये 'मज्जू' भाईची दहशत, व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवला अन्...

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी चोरी; १२ लाखांची रोकड, सोन्याचे दागिने लंपास|VIDEO

राज ठाकरे यांच्याबद्दल अश्लील टिप्पणी; मनसे कार्यकर्त्यांना रीलस्टारला काळे फासून माफी मागायला लावली

Amazon Sale: शॉपिंगसाठी तयार राहा! ॲमेझॉनच्या सर्वात मोठ्या सेलच्या तारखेची घोषणा, जबरदस्त डिस्काऊंट अन् ऑफर

गणपती मिरवणुकीत भाजप अन् ठाकरे गटात मोठा गोंधळ; ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT