Aadhaar Card Update google
बिझनेस

Aadhaar Card Update: कामाची बातमी! हे Aadhaar App कायमचं होणार बंद; UIDAI दिली मोठी अपडेट

UIDAI New Aadhaar App: UIDAI लवकरच mAadhaar ॲप बंद करणार आहे. तर त्याऐवजी सेफ असं नवं Aadhaar App सुरु करणार आहे. यामध्ये अपडेटेड फिचर्सचा समावेश असेल.

Sakshi Sunil Jadhav

भारतीयांचा महत्वाचा पुरावा ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड. तुम्ही याचा वापर महत्वाच्या कामांसाठी करताच. कोणत्याही ठिकाणी प्रवेशासाठी तुमचे ओळखपत्र म्हणून याचा वापर केला जातो. आता सगळं जग डिजीटल माध्यमांचा वापर करतंय तर अनेकांचे महत्वाचे पुरावे हे डिजीटली म्हणजे मोबाईमधल्या अॅपमध्ये सेव्ह केलेले असतात. पण UIDAIने शुक्रवारी यासंदर्भात मोठी अपडेट दिली आहे.

जर तुम्ही आधार कार्डसाठी एमआधार (mAadhaar) ॲप वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) अधिकृतपणे जाहीर केलं आहे की, सध्याचे mAadhaar ॲप लवकरच बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे ते युजर्यना नव्याने लाँच करण्यात आलेल्या आधार ॲपवर स्विच करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

नवीन आधार ॲप आयफोनसाठी ॲप स्टोअर आणि अँड्रॉइड युजर्सासाठी गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. हे ॲप जास्त सुरक्षित, फास्ट आणि युजर फ्रेंडली आहे. महत्वाचं म्हणजे, या ॲपमध्ये १३ भारतीय भाषांचा समावेश केला आहे. त्यामुळे देशभरातल्या विविध भागांमधल्या नागरिकांना ते सहज वापरता येईल.

नव्या ॲपमधले सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे QR शेअरिंग आणि ऑफलाइन ओळख तपासणी. सिलेक्टिव्ह शेअर या फीचरमुळे युजर्सना त्यांचा पूर्ण आधार क्रमांक न देता फक्त आवश्यक माहिती, जसं की नाव, फोटो, वय, पत्ता किंवा मोबाइल नंबर ही माहिती शेअर करता येते. यामुळे प्रायव्हसीचं जास्त संरक्षण होतं.

नवीन ॲपमधून आधारला लिंक केलेला मोबाइल नंबर आणि पत्ता अपडेट करण्याची सुविधाही देण्यात आली आहे. तसेच, एका खात्यात कुटुंबातल्या ५ सदस्यांना जोडण्याची सोयही आहे. पण, mAadhaar ॲपमधील डेटा नवीन ॲपमध्ये आपोआप ट्रान्सफर होईल का, याबाबत UIDAI ने स्पष्ट माहिती दिलेली नाही. त्यामुळे युजर्सना नवीन ॲप डाउनलोड केल्यानंतर आपलं प्रोफाइल पुन्हा सेट करावं लागू शकतं. एकूणच, नवीन आधार ॲप जास्त सुरक्षित आणि आधुनिक सुविधा देणारं असलं तरी, युजर्सनी वेळेत ॲप अपडेट करून गरजेची माहिती पुन्हा नोंदवणं गरजेचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महिलांना मोठा धक्का! फुले वाड्यात वटपौर्णिमेची पूजा बंद; राज्य सरकारचा निर्णय, कारण काय?

Satara Fort : वाईजवळील ऐतिहासिक वैभव, सह्याद्रीच्या कुशीत लपलाय 'हा' भव्य किल्ला

Maharashtra News Live Update: विरारमध्ये गायींच्या तबेल्यावर कारवाईनंतर वाद; महापालिकेसमोर गायी बांधून निषेध

Chapati calories: ४ चपात्यांमध्ये किती प्रमाणात कॅलरीज असतात?

Gold Rate Today: गुड न्यूज! सोनं १५००० रुपयांनी स्वस्त; सुवर्णनगरीतील 18k, 22k आणि 24k चे दर किती?

SCROLL FOR NEXT