Aadhaar Card and SIM Card Rules  saam tv
बिझनेस

एका Aadhaar Card वर किती मोबाईल SIM कार्ड खरेदी करता येतात? काय आहे नियम

Aadhaar Card and SIM Card Rules : भारतीय दूरसंचार नियमांनुसार एका आधार कार्डशी किती सिम कार्ड लिंक करता येतात ते जाणून घेऊ. कायदेशीर मर्यादा, मार्गदर्शक तत्त्वे ओलांडल्यास तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते.

Bharat Jadhav

  • एका आधार कार्डावर जास्तीत जास्त 9 सिम कार्ड खरेदी करण्याची परवानगी आहे.

  • नियमाचे उल्लंघन झाल्यास अतिरिक्त सिम निष्क्रिय केली जाऊ शकते.

  • आधार कार्ड KYC पडताळणीसाठी वापरले जाते.

  • ही मर्यादा टेलिकॉम विभागाने निश्चित केली आहे आणि सर्वांसाठी लागू आहे.

आधार कार्ड हे आजच्या काळातील सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. केवळ ओळखीचा पुरावा म्हणून वापरले जात नाही तर शासकीय आणि बँकेच्या कामसाठी आधार कार्ड वापरले जाते. मोबाईल सिम घ्यायचे असेल तर तुमच्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे. पण एका आधार कार्डावर किती सिम कार्ड खरेदी करता येतात, याची तुम्हाला माहिती आहे का? काय आहे याचा नियम? जर तुम्ही या मर्यादेपेक्षा जास्त सिम कार्ड खरेदी केले तर तुम्हाला कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एका आधार कार्डवर जास्तीत जास्त ९ सिम कार्ड खरेदी करता येऊ शकतात. मशीन टू मशीन (M2M) सेवांसाठी ही संख्या १८ पर्यंत वाढू शकते. M2M सेवा विशेषतः कनेक्टिंग डिव्हाइसेससाठी आहेत. जर तुम्ही ९ पेक्षा जास्त सिम कार्ड खरेदी केले किंवा योग्य कारणाशिवाय त्यांचा वापर केला तर तुम्हाला खालील समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुमची ओळख संरक्षित करण्यासाठी अतिरिक्त सिम कार्ड ब्लॉक केले जाऊ शकतात.

अनेक सिम कार्डचा गैरवापर केल्याने सायबर फसवणूक किंवा इतर बेकायदेशीर कृत्य होऊ शकतात, ज्यामुळे तुम्ही जबाबदार असाल. तुमच्या नावावर रजिस्टर्ड सिम कार्ड कोणत्याही बेकायदेशीर क्रियाकलापासाठी वापरले गेले तर कायदेशीर होऊ शकते. ट्राय आणि दूरसंचार विभाग वेळोवेळी सिम कार्ड यूझर्सची तपासणी करतात. जर तुमच्या आधार कार्डवरील सिम कार्डची संख्या मर्यादेपेक्षा जास्त आढळली तर तुम्हाला नोटीस येऊ शकते.

तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत, हे जाणून घेण्यासाठी TAFCOP पोर्टलवरून तुम्ही तपासू शकतात. TAFCOP वेबसाइटला भेट द्या. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर एंटर करा. OTP व्हेरिफिकेशननंतर, तुमच्या नावावर नोंदणीकृत सर्व सिम कार्डची यादी तुमच्या समोर येईल.

एका आधार कार्डावर किती मोबाईल सिम खरेदी करता येतात?

टेलिकॉम विभागाच्या नियमांनुसार, एका आधार कार्डावर जास्तीत जास्त 9 सिम कार्ड खरेदी करता येतात.

ही मर्यादा सर्वांसाठी सारखीच आहे का?

होय, ही मर्यादा सर्व भारतीय नागरिकांसाठी लागू आहे.

जर मर्यादेपेक्षा जास्त सिम खरेदी केली तर काय होईल?

मर्यादेपेक्षा जास्त सिम असल्यास, टेलिकॉम विभाग सिम निष्क्रिय करू शकतो आणि कायदेशीर कारवाई होऊ शकते.

सिम खरेदीसाठी आधार कार्ड का आवश्यक आहे?

आधार कार्ड हे ओळखपत्र म्हणून KYC पडताळणीसाठी आवश्यक असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Marathon News : ठाणे मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला; घरी गेल्यानंतर स्पर्धकाचा अचानक मृत्यू

Vande Bharat Express : पुणेकरांसाठी खुशखबर! पुण्याहून शेगावला धावणार वंदे भारत एक्सप्रेस, वाचा सविस्तर

Beed Crime : बीडमधील गुन्हेगारी संपेना! ३० वर्षीय तरुणीवर गोळीबार, थेट छातीत गोळी घुसली

Maharashtra Live News Update: डोंबिवलीत हाय प्रोफाईल सोसायटीच्या निवडणुकीत हाणामारी

Independence Day 2025 : स्वातंत्र्याच्या ज्वालेतून पेटलेला प्रगतीचा मशाल...; १५ ऑगस्टसाठी खास प्रभावशाली भाषण, एकदा वाचाच

SCROLL FOR NEXT