Income Tax Bill: मोदी सरकारनं मागे घेतलं इनकम टॅक्स २०२५ विधेयक; स्लॅबमध्ये बदल होणार?

Income Tax Bill : नवीन आयकर विधेयकाच्या सुधारित आवृत्तीला केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने मान्यता दिलीय. नवीन विधेयकाचे उद्दिष्ट भाषा सोपी करणे आणि अनावश्यक तरतुदी काढून टाकणे असा आहे.
Income Tax Bill
Income Tax BillSaam Tv
Published On
Summary
  • केंद्र सरकारने नवीन आयकर विधेयकाची सुधारित आवृत्ती मंत्रिमंडळात मंजूर केली आहे.

  • जुने विधेयक मागे घेऊन नवीन विधेयक लवकरच संसदेत सादर होणार आहे.

  • हे विधेयक भाषा सोपी करणे आणि अनावश्यक नियम हटवणे यावर भर देणार आहे.

  • निवड समितीच्या सूचनांचा विचार करून अंतिम विधेयक तयार करण्यात आलं आहे.

केंद्र सरकारने लोकसभेत इनकम टॅक्स विधेयक मागे घेतलंय. सरकार आता याऐवजी नवीन विधेयक सभागृहात सादर करणार आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये लोकसभेच्या पटलावर ठेवल्यानंतर या विधेयकाला निवड समितीकडे पाठवण्यात आले होते. निवड समितीच्या सर्व सूचनांचे स्वीकार केल्यानंतर सरकार नवीन विधेयक आणणार आहे.

केंद्र सरकारने १३ फेब्रुवारी २०२५ रोजी लोकसभेत हे नवीन विधेयक सादर केले होते. त्याच दिवशी ते छाननीसाठी निवड समितीकडे पाठवण्यात आले होते. समितीने २२ जुलै २०२५ रोजी संसदेत आपला अहवाल सादर केला होता. नवीन आयकर विधेयकाच्या सुधारित आवृत्तीला केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने मान्यता दिलीय.

Income Tax Bill
Agriculture Scheme: जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी सरकार करेल मदत; कसा कराल अर्ज, काय आहे पात्रता?

आता हे विधेयक सोमवारी (११ ऑगस्ट २०२५) लोकसभेत सादर केले जाईल. हे विधेयक ६ दशक जुने आयकर अधिनियम १९६१ च्या जागी आणण्यात आले आहे. भाजप खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्त्वाखालील सेलेक्ट कमिटीनं परीक्षण केल्यानंतर त्यात सुधारणा करण्यात आल्या. नवीन आयकर विधेयकाबाबत सर्वात मोठा प्रश्न स्लॅबबाबत आहे.

Income Tax Bill
PPF Withdrawal: मॅच्युरिटीच्या आधी पीपीएफमधील पैसा काढता येतो का? काय आहे नियम?

नवीन विधेयकात कर स्लॅबमध्ये बदल करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे आयकर विभागाने स्पष्ट केलंय. आयकर विभागाच्या मते, नवीन विधेयकाचा उद्देश भाषा सोपी करणे आणि अनावश्यक तरतुदी काढून टाकणे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com