8th Pay Commission saam tv
बिझनेस

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, 8 व्या वेतन आयोगमुळे पगार कितीने वाढणार? आकडेवारी आली समोर

8th Pay Commission latest news: 8व्या वेतन आयोगात 4.00 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास किमान बेसिक पगार 72 हजार रुपये होऊ शकतो. 3.833 आणि 3.61 फिटमेंट फॅक्टरनुसार पगार किती असेल, विविध पे लेव्हलवर किती वाढ होईल आणि पेन्शनर्सवर काय परिणाम होईल, जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांचं लक्ष सध्या 8व्या वेतन आयोगाकडे लागलंय. केंद्र सरकारचे एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनर्स या आयोगाच्या शिफारशींची आतुरतेने वाट पाहतायत. राज्य सरकारी कर्मचारीही या निर्णयाकडे लक्ष ठेवून आहेत. कारण केंद्राच्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या आधारावरच अनेकदा राज्य सरकारांकडूनही कर्मचाऱ्यांच्या पगारात बदल केले जातात. त्यामुळे आता सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे, 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात नेमकी किती वाढ होणार?

फिटमेंट फॅक्टरची सर्वाधिक चर्चा

7व्या वेतन आयोगाच्या वेळी 7 हजार रुपये असलेली किमान बेसिक सॅलरी वाढून 18 हजार रुपये झाली होती. त्यावेळी 2.57 फिटमेंट फॅक्टर लागू करण्यात आला होता. म्हणजेच 7 हजार रुपयांच्या बेसिक पगाराला 2.57 ने गुणून 18 हजार रुपयांना नवीन किमान बेसिक पे ठरवण्यात आलं होतं.

फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय?

फिटमेंट फॅक्टर म्हणजे एक प्रकारचं गुणक. सध्याच्या बेसिक पगाराला या आकड्याने गुणलं की नवीन बेसिक पगार किती असेल, याचा अंदाज येतो. यामध्ये महागाई भत्त्याचाही विचार केला जातो. महागाई वाढल्यामुळे पगाराची प्रत्यक्ष किंमत कमी होते. त्यामुळे महागाईचा परिणाम भरून काढण्यासोबतच कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष पगारवाढ मिळावी, हा यामागचा उद्देश असतो.

4.00 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास पगार किती होईल?

जर 8व्या वेतन आयोगात 4.00 फिटमेंट फॅक्टर लागू झाला तर सध्या 18 हजार रुपये असलेला किमान बेसिक पे थेट 72 हजार रुपये होऊ शकते. 4.00 फिटमेंट फॅक्टरची मागणी बीपीएमएस म्हणजेच भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाने केली आहे.

त्यांनी ही रक्कम ठरवताना तीन टप्प्यांत गणित मांडलं आहे. 2016-17 ते 2024-25 या काळात दरडोई निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नात झालेली 86.76 टक्के वाढ त्यांनी आधार मानली. त्यानंतर पाच सदस्यांच्या कुटुंबाचा विचार करून ही रक्कम 88,524 रुपये असल्याचं सांगितलं. मात्र सरकारच्या तिजोरीवर किती आर्थिक भार पडेल याचा विचार करून ही रक्कम कमी करून 72 हजार रुपये करण्याची मागणी करण्यात आली आहे.

3.833 फिटमेंट फॅक्टर असल्यास पगार किती?

दुसरीकडे नॅशनल काऊंसिल जेसीएम स्टाफ साइड आणि भारत पेन्शनर्स समाज यांनी 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी केली आहे. हा फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास किमान बेसिक पे 69 हजार रुपये होईल.

स्टाफ साइडने पाच सदस्यांच्या कुटुंबाचा खर्च लक्षात घेऊन हा आकडा मांडला आहे. यामध्ये अन्न, कपडे, घर, इंधन, कौशल्य विकास, लग्न, मनोरंजन आणि तंत्रज्ञानाशी संबंधित खर्चाचा समावेश करण्यात आला आहे. या सगळ्या खर्चाचं गणित केल्यानंतर 68,947 रुपये इतकी रक्कम येते. ती रक्कम राऊंड ऑफ करून 69 हजार रुपये किमान बेसिक पेची मागणी करण्यात आली आहे.

मिनिस्टीरियल स्टाफ असोसिएशन (सर्व्हे ऑफ इंडिया)ने 3.61 फिटमेंट फॅक्टरची मागणी केली आहे. हा फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास किमान बेसिक पगार 65 हजार रुपये होऊ शकतो. संघटनेने हा आकडा ठरवताना 15व्या आयएलसी मानदंडांचा आणि रेप्टाकोस ब्रेट प्रकरणातील निकषांचा आधार घेतलाय.

रेल्वे सीनियर सिटीजन वेलफेअर सोसायटीने कोणताही ठराविक फिटमेंट फॅक्टर सांगितलेला नाही. मात्र त्यांचं म्हणणं आहे की, अनेकदा फिटमेंट फॅक्टरचा फायदा केवळ महागाई भत्ता वाढवण्यापुरताच मर्यादित राहतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हातात येणाऱ्या प्रत्यक्ष पगारात फार मोठी वाढ होत नाही.

3.61 आणि 4.00 फिटमेंट फॅक्टरमध्ये किती फरक?

  • लेव्हल-1 कर्मचाऱ्याचा विचार केला तर 3.61 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास बेसिक पगार 64,980 रुपये होईल.

  • तर 4.00 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास हाच पगार 72 हजार रुपये होईल.

  • म्हणजे दोन्हीमध्ये दर महिन्याला तब्बल 7,020 रुपयांचा फरक पडू शकतो.

वेगवेगळ्या लेव्हलवर किती पगार होऊ शकतो?

  • स्टाफ साइडने 3.833 फिटमेंट फॅक्टरच्या आधारे संपूर्ण पे मॅट्रिक्सही तयार केली आहे. यानुसार-

  • लेव्हल-1: 69,000 रुपये

  • लेव्हल-6: 1,35,700 रुपये

  • मर्ज केलेले लेव्हल-9 आणि 10: 2,15,100 रुपये

दुसरीकडे, बीपीएमएसने 4.00 फिटमेंट फॅक्टरच्या आधारे पे मॅट्रिक्स मांडली आहे. त्यानुसार लेव्हल-1 पासून 72 हजार रुपयांनी पगार सुरू होऊन लेव्हल-18 पर्यंत तो 10 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो.

पेन्शनर्ससाठीही 8वा वेतन आयोग महत्त्वाचा

8वा वेतन आयोगाचा परिणाम फक्त सध्या नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित नाही. पेन्शनर्ससाठीही हा निर्णय महत्त्वाचा आहे. बेसिक पे कमी राहिल्यास निवृत्तीनंतर मिळणारी पेन्शन, ग्रॅच्युइटीची मर्यादा आणि कम्युटेशनची रक्कम यावरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे आता 8व्या वेतन आयोगात सरकार कोणता फिटमेंट फॅक्टर स्वीकारणार आणि त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारात किती वाढ होणार, याकडे कर्मचारी आणि पेन्शनर्स दोघांचंही लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon: एकाच कुटुंबातील चौघांची सामूहिक आत्महत्या, धावत्या ट्रेनसमोर उडी मारली; जळगाव हादरले

Narli Pournima 2026: नारळी भात बनवताना ‘या’ ५ गोष्टी लक्षात ठेवा; भात होईल एकदम परफेक्ट

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या रडारवर राज्यातील अंगणवाड्या, आता तरी मुलांना पौष्टीक आहार मिळणार?

Maharashtra News Live Update: शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून बेरोजगार हक्क एल्गार

Gold Rate Today : सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! सणासुदीच्या तोंडावर सोन्याच्या दरात मोठी घसरण; वाचा 22k, 18k, 24k ताजे दर

SCROLL FOR NEXT