8th Pay Commission Saam tv
बिझनेस

8th Pay Commission: ना पगार, ना भत्ता; आठव्या वेतन आयोगाचा या कर्मचाऱ्यांना मिळणार नाही फायदा; वाचा सविस्तर

8th Pay Commission Update: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची बातमी आहे. आठव्या वेतन आयोगाचा फायदा काही कर्मचाऱ्यांना मिळणार नाहीये.

Siddhi Hande

आठव्या वेतन आयोगाबाबाबत महत्त्वाची बातमी

आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांना मिळणार नाही फायदा

सरकारी कर्मचाऱ्यांना काय होणार फायदा?

आठवा वेतन आयोग लवकरात लवकर लागू करण्याबाबत सरकार महत्त्वाची पाऊले उचलत आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये याबाबत चर्चा होते. दरम्यान, आता कर्मचाऱ्यांना पगारवाढ, फिटमेंट फॅक्टरमध्ये बदल आणि पेन्शनमध्ये वाढ करण्याची अपेक्षा आहे.

केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग कधी लागू होणार याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. मात्र, अनेकांनी अंदाज वर्तवले आहे.

आठवा वेतन आयोग लागू झाला तर तो मागच्या ७व्या वेतन आयोगाप्रमाणेच वेतनवाढ, फिटमेंट फॅक्टर, भत्ते आणि पेन्शनचा आढावा घेईल असं सांगितलं आहे. याचा फायदा कोणाला होणार आणि कोणाला नाही ते जाणून घ्या.

या कर्मचाऱ्यांना मिळणार नाही फायदा

नियमानुसार, आठव्या वेतन आयोगाचा सरसकट फायदा सर्व कर्मचाऱ्यांना होणार नाहीये.

खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा आणि आठव्या वेतन आयोगाचा काहीही संबंध नाही. त्यांना याचा फायदा होणार नाही. या शिफारसी फक्त केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होतात.

केंद्रीय नागरी सेवा नियमांतर्गत समाविष्ट नसलेल्या कर्मचाऱ्यांना किंवा कंत्राटी आणि तात्पुरत्या कर्मचाऱ्यांनाही याचा फायदा होणार नाही.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाच्या शिफारसी पूर्ण स्विकारल्या तरच फायदा होईल. हा निर्णय राज्य सकारवर अवलंबून असणार आहे,

सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे (PSUs) कर्मचारी. या संस्थांची रचना वेगवेगळी असते. जोपर्यंत केंद्र सकारच्या शिफारसी लागू होत नाही तोपर्यंत या कर्मचाऱ्यांना थेट लाभ मिळत नाही.

याचसोबत स्वायत्त संस्थांच्या कर्मचाऱ्यांनाही केंद्र सरकारच्या वेतन नियमांचे पालन केल्यास लाभ होणार आहे.

५० लाख कर्मचारी आणि ६९ पेन्शनधारकांना फायदा

आठव्या वेतन आयोगाबाबत कोणतीही अधिसूचना जारी केलेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असं सांगितले आहे. आठव्या वेतन आयोगाचा फायदा ५० लाख कर्मचारी आणि ६९ लाख पेन्शनधारकांना होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri Rings Designs : हातांच्या सौंदर्यात पडेल भर! घागरा चोळीवर खुलून दिसतील 'या' ७ स्टायलिश रिंग्स

Hair Care: केस लगेच फ्रिझी होतात? मग वापरा या ७ सोप्या टिप्स; केस होतील मऊ, मुलायम आणि चमकदार

Maharashtra News Live Update : महायुतीत एकनाथ शिंदे पुन्हा नाराज

DA Hike Calculation: DA वर आयकर लागतो का? केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मनातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे

Property News: अनधिकृत बांधकामांवर फडणवीस सरकारचा मोठा प्रहार; घेतला मोठा निर्णय, नियम मोडणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई

SCROLL FOR NEXT