8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना बसणार मोठा धक्का! या सुविधेपासून राहावे लागणार दूर

8th Pay Commission Salary Hike Update: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. स्वायत्त संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकाच ठिकाणी पोस्टिंग देण्याबाबत कोणताही विचार नसल्याचे सरकारने सांगितले आहे.

Siddhi Hande

आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

स्वायत्त संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकाच ठिकाणी पोस्टिंग नाही

सरकार सध्या प्रस्तावाचा विचार करत नाही

आठव्या वेतन आयोगाबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांना खूप अपेक्षा आहे. मात्र, आता सरकारने दिलेल्या एका माहितीमुळे कर्मचाऱ्यांना धक्काच बसला आहे. स्वायत्त संस्थांमध्ये काम करणाऱ्यांबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. सरकारने स्पष्ट केलंय की, सध्याच्या स्थितीत तरी स्वायत्त संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या नवरा-बायकोला एकाच ठिकाणी नियुक्ती देण्याबाबत कोणताही विचार नाहीये.

राजसभेत प्रा. मनो कुमार झाला यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. यावेळी राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सरकारने ३० सप्टेंबर २००९ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, पती आणि पत्नीला एकाच ठिकाणी नियुक्ती देण्याचे आदेश दिले होते. जेव्हा पती आणि पत्नी दोघेही केंद्र सरकारमध्ये काम करत असेल त्यांच्यासाठीच हा नियम लागू होतो.

सरकारने स्पष्ट केले की, या धोरणाचा विस्तार करुन केंद्र अनुदानित संस्था किंवा इतर संस्थाना लागू करण्याबाबत कोणताही प्रस्ताव नाहीये.म्हणजेच आता स्वायत्त संस्थांमध्ये काम करणाऱ्या जोडप्यांना एकाच ठिकाणी काम करता येणार नाहीये. याबाबत सरकारच कोणताही विचार नाहीये.

केंद्र सरकारच्या या उत्तरावर अखिल भारतीय एनपीएस कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मनजीत सिंह पटेल यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, हे अत्यंत दुर्दैवी आहे. स्वायत्त संस्थेत काम करणाऱ्या पती-पत्नीची एकाच ठिकाणी बदली करण्यात आलेली नाही. सरकार याबाबत कोणताही विचारदेखील करत नसल्याचे दिसत आहे. या शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilled Water: थंड पाणी पिणे फायदेशीर की हानिकारक? जाणून घ्या शरीरावर होणारे ७ परिणाम!

Gold Rate Today: नवरात्रीत सोन्याच्या दरात मोठी घसरण, 10 तोळा सोनं 3,900 रुपयांनी स्वस्त; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

Maharashtra News Live Update : जंतर-मंतरवर खळबळ! CJPचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका पोलिसांच्या ताब्यात

Papaya Leaf Juice Benefits for Platelets: रक्तातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी प्या पपईच्या पानांचा रस; जाणून घ्या योग्य पद्धत

ट्रॅफिकची झंझट कायमची मिटणार! मरीन ड्राईव्ह ते ऑरेंज गेट फक्त ५ मिनिटांत; मुंबईकरांसाठी मोठी बातमी

SCROLL FOR NEXT