सरकारने आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली आहे. आठवा वेतन आयोग २०२६ मध्ये लागू होणार आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगारात चांगलीच वाढ होणार आहे. याचसोबत सरकार अजून एक महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. यामध्ये आठव्या वेतन आयोगाअंतर्गत महागाई भत्ता हा तुमच्या पगारात येऊ शकतो. याचसोबत काही भत्त्यांमध्येही वाढ होऊ शकते.
मेडिकल अलाउंसमध्ये ३ टक्क्यांनी वाढ (Medical Allowance Increase)
११ मार्च २०२५ मध्ये दिल्लीतील SCOVA मीटिंगमध्ये पेन्शनधारकांच्या फिक्स्ड मेडिकल अलाउंसबाबत महत्त्वाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. सध्या मेडिकल अलाउंस १००० रुपये आहे त्याला वाढवून ३००० रुपये प्रति महिना केला जावा.वाढती महागाई लक्षात घेता हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.हा प्रस्ताव आठव्या वेतन आयोगात सहभागी करण्याची शिफारस केली गेली आहे.
HRA आणि इतर भत्त्यांमध्ये वाढ (HRA Hike)
याच बैठकीत सांगितले गेले आहे की, पगारासोबतच हाउस रेंट अलाउंस (HRA),ट्रॅव्हल अलाउंस, महागाई भत्ता (DA Hike), मेडिकल अलाउंसमध्ये (Medical Allowance) वाढ केली जावी. यामुळे कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये वाढ केली जाण्याचे शक्यता आहे.याचसोबत सरकार काही जुने भत्ते बंद करण्याचा विचार करत आहे. जेणेकरुन सुविधा अजून चांगल्या पद्धतीने मिळेल.
महागाई भत्ता आणि पगाराचे विलीनीकरण होणार? (8th Pay Commission And DA Hike Come Together)
७व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर २.५७ ठेवला होता. तेव्हा बेसिक सॅलरी १८००० रुपये होती. आता वाढवून २७००० होऊ शकते. ८ व्या वेतन आयोगात महागाई भत्तादेखील दिला जाऊ शकतो. सध्या याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. वेतन आयोगाची समिती झाल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.