8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आठव्या वेतन आयोगाबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय

8th Pay Commission Salary Hike Update: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे. आता सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगात निवेदने सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

Siddhi Hande

आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

कर्मचाऱ्यांना निवेदन सादर करण्यासाठी मुदत वाढवली

३१ मे २०२६ पर्यंत करता येणार निवेदन

केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.आता आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांना निवेदने सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ही तारीख ३० एप्रिलवरुन ३१ मे करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आपल्या सूचना निवेदन देण्यासाठी एक महिन्यांचा वेळ मिळाला आहे. नॅशनल काउंसिलच्या (NC-JCM)च्या मागणीवर विचार केल्यानंतर आयोगाने हा निर्णय घेतला आहे. यामुळे कर्मचारी संघटनांना आपल्या मागण्या मांडण्यासाठी वेळ मिळेल.

३१ मेपर्यंत मुदतवाढ

आयोगाने निवेदने देण्याची मुदत वाढवली आहे. मात्र, निवेदन देण्याचे नियम कठोर केले आहेत. आता सर्व निवेदने ऑनलाइन लिंकच्या माध्यमातून दिली जातील. आयोगाने स्पष्ट केले की, कागदपत्रांद्वारे दिलेली निवेदने, हार्ड कॉपी, पीडीएफ किंवा ईमेलद्वारे पाठवलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाही.

मुदतवाढ का देण्यात आली?

राष्ट्रीय संयुक्त सल्लागार परिषदेने (NC-JCM) मंगळवारी आयोगाच्या अध्यक्ष रंजना प्रकाश देसाई यांची भेट घेतली. कर्मचारी संघटनांनी सांगितले की, अनेक संघटना आणि निवृत्तीवेतनधारक संघटनांना ऑनलाइन निवेदन देण्यास अडचणी येत आहेत. १८ ते ३० एप्रिलदरम्यान दिल्लीत आठव्या वेतन आयोगाची महत्त्वाची बैठक झाली. त्यानंतर ही मुदतवाढ देण्यात आली. या मुदतवाढीमुळे फिटमेंट फॅक्टरवर निर्णय होण्यास उशिर होईल. यामळे कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू होण्यासाठी आणखी वेळ लागू शकतो.

आठव्या वेतन आयोगात निवेदन सादर करण्याची अंतिम मुदत ३१ मे आहे. आठव्या वेतन आयोगाच्या सर्व सूचना प्राप्त झाल्यानंतर विश्लेषण सुरु होईल. यादरम्यान आयोग विविध कर्मचारी संघटना, मंत्रालये आणि केंद्रशासिक प्रदेशांचे नोडल अधिकारी यांनी ऑनलाइन पद्धतीने सादर केलेल्या मागण्यांवर विचारल करेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mrunal Thakur Photos: 'तुझ्या डोळ्यात काजळ लय गया रे...' मृणालचे फोटो पाहून चाहत्यांना झाला आनंद

Maharashtra News Live Update: अक्षय म्हस्के गोळीबार व हल्ला प्रकरणी आरोपींना २७ मे पर्यंत पोलीस कोठडी

IPL rules: आयपीएलमध्ये येणार नवे नियम; १०० मीटरपेक्षा लांब षटकार मारला तर ८ धावा मिळणार?

हृदयद्रावक! सासूच्या अंत्यसंस्कारासाठी जावई नदीवर गेला, मगरीने पाण्यात ओढला; एकाच दिवशी कुटुंबावर दुहेरी आघात

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

SCROLL FOR NEXT