8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी ₹६९,००० होणार? फिटमेंट फॅक्टरबाबत मोठी अपडेट

8th Pay Commission Salary Hike Update: सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत आयोगाला निवेदन देण्यात आले आहे. यामध्ये आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर ३.८३ करण्याची मागणी केली जात आहे.

Siddhi Hande

आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट

फिटमेंट फॅक्टर ३.८३ करण्याची मागणी

कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी ६९,००० होणार

सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहे. आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. नॅशनल काउंसिलच्या स्टाफ साइडने आयोगाला ५१ पानांचे निवेदन आयोगाला पाठवले आहे. जेसीएम सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांच्या गरजा आणि वाढती महागाई लक्षात घेऊन महत्त्वाचे प्रस्ताव देण्यात आले आहेत.

फिटमेंट फॅक्टरची मागणी (8th Pay Commission Fitment Factor Update)

शिव गोपाल मिश्रा यांनी पोस्टमध्ये लिहलंय की, सर्वात मोठी प्रस्ताव हा फिटमेंट फॅक्टरबाबत आहे. यावेळी ३.८३ फिटमेंट फॅक्टर सुचवण्यात आला आहे. या आधारावर सध्याचा मूळ पगार १८,००० रुपयांवरुन ६९,००० पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. कमाल पगार २,१५,००० रुपयांपर्यंत वाढवण्याचेही सांगण्यात आले आहे. जर आठव्या वेतन आयोगाने हा प्रस्ताव स्विकारला तर कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगलीच वाढ होऊ शकते.

फॅमिली युनिटबाबतही प्रस्ताव (8th Pay Commission Family Unit )

आठव्या वेतन आयोगात फॅमिली युनिटमध्येही बदल करण्याती मागणी करण्यात आली आहे. फॅमिली युनिट ५ सदस्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. पालकांचा फॅमिली युनिटमध्ये समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. जेणेकरुन कर्मचाऱ्यांना खर्चासाठी कोणतीही अडचण येणार नाही.

वार्षिक पगारवाढीबाबत सूचना ( 8th Pay Commission Annual Increment)

वार्षिक पगारवाढीमध्येही मोठा बदल करण्याचा प्रस्ताव आहे. वार्षिक इंक्रिमेंट ३ टक्क्यांवरुन ६ टक्के करण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे कर्मचाऱ्याचंा पगार चांगला वाढेल.

वेतनश्रेणीत बदल

वेतनश्रेणीत बदल करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. सध्याची लेव्हल २ आणि ३ वेतनश्रेणी एकत्र करुन नवीन वेतनश्रेणी तयार करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच लेव्हल ४ आणि ५, ७ आणि ८, ९ आणि १०चेही विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे वेतनरचना कमी होऊन कर्मचाऱ्यांना फायदा होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळी मोर्चानंतर पंढरपूरमध्ये भाजप- राष्ट्रवादी शरद पवार गटात आरोप प्रत्यारोप

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT