8th Pay Commission  google
बिझनेस

8th Pay Commission: बेसिक सॅलरी ₹६५०००; HRA आणि महागाई भत्त्यात वाढ; आठव्या वेतन आयोगाबाबत नवी अपडेट समोर

8th Pay Commission Salary Hike Update: आठव्या वेतन आयोगासाठी ४ आणि ५ मे रोजी पुुण्यात बैठक झाली. यामध्ये अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. बेसिक सॅलरी ६५००० रुपये करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Siddhi Hande

आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

बेसिक सॅलरी ६५००० रुपये करण्याची मागणी

जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची मागणी

आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आठव्या वेतन आयोगाच्या टीमने महाराष्ट्रात महत्त्वाची बैठक घेतली आहे. पुण्यात ही बैठक पार पडली आहे. ४ आणि ५ मे रोजी कर्मचारी संघटनांशी महत्त्वपूर्ण चर्चा केली आहे. यामध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा केली आहे.

या बैठकीत महाराष्ट्र राज्य पेन्शन संघटना (MSOPO) ने आपल्या मागण्या सांगितल्या आहेत. यामध्ये बेसिक सॅलरी १८,००० रुपयांवरुन ६५,००० करण्याची मागणी केली आहे. याचसोबत टीए आणि महागाई भत्ता, एचआरएमध्येदेखील वाढ करण्याची मागणी केली आहे.

सध्या कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी १८,००० रुपये आहे. ही बेसिक सॅलरी ६५००० रुपये करण्याची मागणी केली जात आहे. याचसोबत फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे. फिटमेंट फॅक्टर २.५७ वरुन ३.८ करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

आठव्या वेतन आयोगात फॅमिली युनिट ३ वरुन ५ करण्याचीही मागणी केली आहे. याचसोबत एचआरए १० टक्क्यांवरुन १२ टक्के, २० टक्क्यांवरुन २४ टक्के आणि ३० टक्क्यांवरुन ३६ टक्के करण्याची मागणी केली जात आहे. याचसोबत महागाई भत्त्याबाबतहीकाही मागण्या केल्या आहे.

जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी

कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली आहे. ८५ लाख कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली आहे. याचसोबत नोकरीदरम्यान मृत्यू झाल्यास फॅमिली पेन्शन ५० टक्के ठेवण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर काँग्रसचे आंदोलन

Pune : पुण्यातील धक्कादायक घटना! प्रेम प्रकरणातून गर्लफ्रेंडचा गळा चिरला, बॉयफ्रेंडने घरात घुसून केले सपासप वार

Aamba Panha Recipe: बाजारात आलेल्या आंब्यांपासून घरी बनवा आंबट गोड रिफ्रेशिंग आंबा पन्हं, वाचा सोपी रेसिपी

धक्कादायक! नागपूरमध्ये तहसीलदाराला जेसीबीला लटकवलं, ४ किमी फरफटत नेलं

Dalimb Benefits : उन्हाळ्यात रोज सुपरफ्रूट डाळिंब खल्ल्याने होतात हे ७ आरोग्यवर्धक फायदे

SCROLL FOR NEXT