8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: शिपाई ते IAS; आठव्या वेतन आयोगात कोणाचा पगार कितीने वाढणार?वाचा कॅल्क्युलेशन

8th Pay Commission Salary Hike From Peon to IAS Officer: आठवा वेतन आयोग लागू होणार आहे. यामुळे कोट्यवधी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. दरम्यान, पगार कितीने वाढणार हे जाणून घ्या.

Siddhi Hande

आठवा वेतन आयोग १ जानेवारीपासून होणार लागू

सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार

शिपाई ते आयएएस अधिकाऱ्यांचा पगार कितीने वाढणार?

सातवा वेतन आयोग ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपणार आहे. १ जानेवारी २०२६ पासून आठवा वेतन आयोग सुरु होणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळणार आहे. मात्र, कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आठव्या वेतन आयोगाचा थेट फायदा १.१९ कोटींपेक्षा कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधाकांना होणार आहे.

आठव्या वेतन आयोगात पगार कितीने वाढणार? (8th Pay Commission Salary Hike)

आठव्या वेतन आयोगात पगार कितीने वाढणार हे फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असणार आहे. फिटमेंट फॅक्टर किती ठरतो यावर सर्व अवलंबून आहे. जर फिटमेंट फॅक्टर २.१५ असेल तर कर्मचाऱ्यांचा पगार आणि पेन्शनमध्ये कितीने वाढणार होणार ते जाणून घ्या. लेव्हल १ ते १८ पर्यंत कर्मचाऱ्यांचे पगार कितीने वाढणार हे वाचा.

पगार कितीने वाढणार?

  • लेव्हल १ - बेसिक सॅलरी १८००० रुपयांवरुन ३८,७०० होईल.

  • लेव्हल २- बेसिक पे १९,९०० रुपयांवरुन ४२,७८५ रुपये होईल.

  • लेव्हल ३- २१,७०० वरुन पगार ४६,६५५ रुपये पगार होईल.

  • लेव्हल ४- बेसिक सॅलरी २५,५०० वरुन ५४,८२५ रुपये होईल.

  • लेव्हल ५- कर्मचाऱ्यांचा मूळ पगार २९२०० वरुन ६२,७८० रुपये होईल.

  • लेव्हल ६- कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी ३५,४०० रुपयांवरुन ७६,११० रुपये होईल.

  • लेव्हर ७- ४४,९०० रुपयांवरुन ९६,५३५ रुपये मूळ पगार होईल.

  • लेव्हल ८- बेसिक सॅलरी ४७,६०० रुपयांवरुन पगार १,०२,३४० रुपये होईल.

  • लेव्हल ९- बेसिक सॅलरी ५३,१०० रुपयांवरुन पगार १,१४,१६५ रुपये होईल.

  • लेव्हल १०- बेसिक सॅलरी ५६,१०० रुपयांवरुन पगार १२०,६१५ रुपये होईल.

  • लेव्हल ११- बेसिक सॅलरी ६७,७०० रुपयांवरुन पगार १६९,४२० रुपये होईल.

  • लेव्हल १२- बेसिक सॅलरी ७८८०० रुपयांवरुन पगार १६९,४२० रुपये होईल.

  • लेव्हल १३- बेसिक सॅलरी १,१८,५०० रुपयांवरुन पगार २,५४,७७५ रुपये होईल.

  • लेव्हल १४- बेसिक सॅलरी १,४४,२०० रुपयांवरुन पगार ३१०,०३० रुपये होईल.

  • लेव्हल १५- बेसिक सॅलरी १,८२,२०० रुपयांवरुन पगार ३,९१,७३० रुपये होईल.

  • लेव्हल १६- बेसिक सॅलरी २०५,४०० रुपयांवरुन पगार ४,४१,६१० रुपये होईल.

  • लेव्हल १७- बेसिक सॅलरी २,२५,००० रुपयांवरुन पगार ४,८३,७५० रुपये होईल.

  • लेव्हल १८- बेसिक सॅलरी २,५०,००० रुपयांवरुन पगार ५,३७,५०० रुपये होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Surupsingh Naik Passes Away: आदिवासी युवकांचा आधारस्तंभ हरपला; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांचे निधन

अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभारणी, नगराध्यक्ष ते आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या; ऐन निवडणुकीत राज्य सरकारचे ४ महत्वाचे निर्णय

Urfi Javed: रात्री ३ वाजता दोन पुरुषांनी दार ठोठावलं अन्...; उर्फी जावेदसोबत नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: जळगावात 'राज-उद्धव' युतीचा धमाका; उबाठा आणि मनसे कार्यकर्ते एकत्र

Heart health new year resolutions: नव्या वर्षात हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवायचंय? हे ५ संकल्प नक्की करा

SCROLL FOR NEXT