8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: लेव्हल १ ते १८; आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार?

8th Pay Commission Salary Hike From Level 1 to 18 Employees: आठवा वेतन आयोग जानेवारी २०२६ पासून लागू झाला आहे. आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचा पगार चांगलाच वाढणार आहे. हा पगार कितीने वाढणार त्याचं कॅल्क्युलेशन वाचा.

Siddhi Hande

आठव्या वेतन आयोगात पगार कितीने वाढणार?

लेव्हल १ ते लेव्हल १८ कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार?

पगारवाढीचं कॅल्क्युलेशन वाचा

सरकारी कर्मचाऱ्यांच्या आठव्या वेतन आयोगाला मंजुरी मिळाली आहे. आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. दरम्यान, आठव्या आयोगात कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार याबाबत तज्ज्ञांनी आपले मत व्यक्त केले आहे.

मिडिया रिपोर्टनुसार, आठव्या वेतन आयोगातील पगार आणि पेन्शन वाढ ही फिटमेंट फॅक्टरवर निश्चित होते. यासाठी समिती स्थापन केली आहे. ही समिती शिफारसी सादर करेल. त्यानंतर सरकारने मंजुरी दिल्यानंतर पगारवाढ होणार आहे.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, फिटमेंट फॅक्टर १.७० ते २.८६ च्या मध्ये असू शकतो.यामध्ये लेव्हल १ ते १८ पर्यंतच्या कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार ते जाणून घ्या.

पगार कितीने वाढणार?

जर फिटमेंट फॅक्टर २.१५ झाला तर पगारवाढ

लेव्हल १ कर्मचाऱ्यांचा पगार १८००० रुपयांवरुन ३८,७०० रुपये होईल. म्हणजेच २०,७०० रुपयांनी वाढ होईल.

लेव्हल १० कर्मचाऱ्यांचा पगार ५६,१०० वरुन १,२०,६१५ रुपये होईल. हा पगार ६४,५१५ वाढेल.

लेव्हल १८ कर्मचाऱ्यांचा पगार २,५०,००० वरुन ५,३७,५०० रुपयांनी वाढ झाली आहे. एकूण पगार २,८७,५०० रुपयांनी वाढू शकतो.

२.८६ फिटमेंट फॅक्टर झाल्यास पगारवाढ

लेव्हल १ कर्मचाऱ्यांचा पगार १८००० रुपयांवरुन ५१,४८० होईल. हा पगार ३३,४८० रुपयांनी वाढेल.

लेव्हल ३ कर्मचाऱ्यांचा पगार २१,७०० वरुन ६२,०६२ रुपये होईल. हा दर ४०,३६२ रुपयांनी वाढेल.

लेव्हल ६ नुसार कर्मचाऱ्यांना ३५,४०० रुपयांवरुन १,०१,२४४ रुपये होईल. हे दर ६५,८४४ रुपयांनी वाढेल.

लेव्हल १० कर्मचाऱ्यांचा पगार १,०४,३४६ रुपयांनी वाढू शकतो. हा पगार ६५,८४४ रुपयांवरुन १,६०,४४६ रुपये होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! नंदूरबारमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या माजी आमदाराला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्याना सांगून माझा भाजप प्रवेश थांबवला- शिवाजी सावंत

NABARD Recruitment: नाबार्डमध्ये सरकारी नोकरीची संधी; १६२ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Silver Rate : सोन्यापेक्षा चांदीने भाव खाल्ला, किंमत ३ लाखांच्या पुढे

Winter Hair Care: थंडीत केस खूप गळतायेत? अंड्याचा करा असा वापर; केस होतील मजबूत आणि काळेभोर

SCROLL FOR NEXT