8th Pay Commission saam tv
बिझनेस

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपणार? ८व्या वेतन आयोगाबाबत आली मोठी अपडेट

Salary Hike : आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारला ३ लाख कोटींचा जास्तीचा खर्च येण्याचा अंदाज आहे.

Sakshi Sunil Jadhav

केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचं लक्ष सध्या आठव्या वेतन आयोगाकडे लागलं आहे. नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर पगार आणि पेन्शनमध्ये किती वाढ होणार, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. पण हा आयोग लागू करणं केंद्र सरकारसाठी आर्थिकदृष्ठ्या सोपं असणार नाही. कारण आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी सरकारला ३ लाख कोटी रुपयांचा जास्तीचा खर्च करावा लागू शकतो. डॉएश बँक रिसर्चच्या (Deutsche Bank Research)च्या अहवालातून हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पात सरकारसमोर मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे.

सरकारवर ३ लाख कोटींचा जास्तीचा बोजा?

डॉएश बँकेच्या 'Great Expectations, But Risky Business' या अहवालानुसार, आठव्या वेतन आयोग लागू झाल्याने केंद्र सरकारच्या खर्चात मोठी वाढ होऊ शकते. याचा परिणाम आर्थिक वर्ष २०२७ - २८ च्या अर्थसंकल्पावर होण्याची शक्यता आहे. अहवालानुसार, या वेळेत देशाची वित्तीय तूट GDP च्या ४.३ टक्क्यांपर्यंत राहू शकते.

वेतन आयोगाला उशीर झाल्यावर एरियर मिळणार का?

कर्मचाऱ्यांसाठी या अहवालातली सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एरियर आहे. सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करायला उशीर केला, तर कर्मचाऱ्यांना मागच्या प्रभावी तारखेपासून थकबाकी द्यावी लागू शकते. त्यामुळे आयोगाची अंमलबजावणी २०२८ पर्यंत लांबल्यावर सरकारवरच्या एरियरचा आर्थिक भार आणखी वाढू शकतो.

कर्मचाऱ्यांच्या वाढलेल्या पगाराचा बाजाराला फायदा

वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या हातात जास्त पैसे आल्यावर घर, कार, दुचाकी, मोबाईल आणि इतर वस्तूंची खरेदी वाढू शकते. मोतीलाल ओसवालच्या अहवालानुसार, आठव्या वेतन आयोगामुळे २०२७ मध्ये वाहन आणि FMCG क्षेत्रात १.६ ते १.९ लाख कोटी रुपयांची जास्तीची मागणी निर्माण होऊ शकते.

भारताच्या GDP वाढीबाबत अंदाज

डॉएश बँकेने भारताच्या आर्थिक विकासाबाबतही अंदाज व्यक्त केला आहे.

२०२६-२७ : ७.३ टक्के

२०२७-२८ : ७.२ टक्के

२०२८-२९ : ७.३ टक्के

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Agriculture : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान! कमी पाण्यात भरघोस उत्पन्न देऊ शकणारी ७ पिके

Maharashtra News Live Update : माहीममधील ज्वेलर्सवर गोळीबार प्रकरणी गुन्हे शाखेचा तपास; सहा पथके तीन राज्यांत रवाना

Tea Strainer Cleaning: चहाच्या गाळणीवर जमा झालेला काळाकुट्ट थर जमा झालाय? घरच्या घरी हे 5 सोपे उपाय वापरून तर बघा

Delimitation Bill : डिलिमिटेशनला पाठिंबा देणाऱ्यांना Rahul Gandhi यांचा थेट इशारा, LOP नेमकं काय म्हणाले?

केसांसाठी लाकडी कंघवा वापरायचा की नाही? त्याचे फायदे काय आहेत जाणून घ्या

SCROLL FOR NEXT