8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट; अर्थसंकल्पानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार? वाचा

8th Pay Commission Salary Hike After Budget 2026: आठवा वेतन आयोग लागू झाल आहे. या नवीन वेतन आयोगात पगारवाढ कधीपासून येणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, पगारवाढ येण्यास अजून उशिर होऊ शकतो.

Siddhi Hande

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार?

आठव्या वेतन आयोगाचा अर्थसंकल्पावर होणार परिणाम

सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगातील पगारवाढीची वाट पाहत आहेत. जानेवारी २०२६ पासून आठवा वेतन आयोग लागू झाला आहे. मात्र, आठव्या वेतन आयोगात पगारवाढ कधी येणार असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडलेला आहे. दरम्यान, अजूनही याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे पुढच्या काही दिवसात तरी पगारवाढ होणे शक्यत नाही.

रेटिंग एजन्सी ICRAच्या रिपोर्टनुसार,आठव्या वेतन आयोगात पगारवाढ येण्यास उशिर होणार आहे. याचा परिणाम फक्त कर्मचारी नव्हे तर देशाच्या अर्थव्यवस्थेवरही होणार आहे. त्यामुळे यावेळी अर्थसंकल्पातील खर्च मर्यादा वाढवली जाऊ शकते.

आठवा वेतन आयोग येण्यास उशिर का? (Why 8th Pay Commission Delay)

दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू केला जातो. २०१६ मध्ये सातवा वेतन आयोग लागू केला होता. त्यानंतर आता २०२६ पासून नवीन आठवा वेतन आयोग लागू झाला आहे. दरम्यान, याबाबतची पगारवाढ वेतन आयोगाच्या शिफारसीनंतर होणार आहे. समितीला शिफारसींसाठी १५ ते १८ महिन्यांचा कालावधी दिली आहे. या शिफारसी मंजूर झाल्यानंतर पगारवाढ होणार आहे.

एरियर कधीपासून वाढणार? (8th Pay Commission Arrears)

ICRA च्या मते, आठवा वेतन आयोग लागू झालेल्या दिवसापासून पगारवाढ मिळणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना १५ किंवा त्यापेक्षा जास्त महिन्यांचा एरियर मिळू शकतो. यामुळे सरकारी खर्चावरचा ताण वाढणार आहे. मागच्या वेळी सातव्या वेतन आयोगात फक्त ६ महिन्यांचा एरियर द्यावा लागला होता. त्यामुळे खर्चामध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली होती. यावेळी १५ महिन्यांचा एरियर द्यावा लागला तर खर्च ४० ते ५० टक्के वाढू शकतो. त्यामुळे अर्थसंकल्पावर परिणाम होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

Fact Check: देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक? CJP समर्थकांकडून हायड्रोजन ट्रेन टार्गेट?

SCROLL FOR NEXT