8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाचा निर्णय! सरकारने उचलले मोठे पाऊल

8th Pay Commission Update: आठव्या वेतन आयोगासाठी महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे. आता कर्मचारी आणि पेन्शनधारकांकडून सूचना मागवण्यास सुरुवात केली आहे.

Siddhi Hande

आठव्या वेतन आयोगासाठी महत्त्वाचा निर्णय

कर्मचारी आणि पेन्शनधारकांकडून सूचना मागवण्यास सुरुवात

४८ लाख कर्मचारी आणि ६७ लाख पेन्शनधारकांवर होणार परिणाम

आठव्या वेतन आयोगाबाबत केंद्र सरकारने महत्त्वाची पाऊले उचलली आहेत. केंद्र सरकारने लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना खुशखबर दिली आहे. आठव्या वेतन आयोगासाठी कर्मचारी आणि पेन्शनधारकांकडून सूचना मागवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.याच माध्यमातून भत्ते, वेतन आणि पेन्शनमध्ये बदल केले जातात. याचा थेट परिणाम ४८ लाख कर्मचारी आणि ६७ लाख पेन्शनधारकांवर होणार आहे.

आता केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगासाठी ऑनलाइन पोर्टल सुरु केले आहे.याचसोबत ३० एप्रिलपर्यंत कर्मचाऱ्यांना आपल्या सूचना देण्यास सांगण्यात आली आहे.

आयोगाने मागितल्या सूचना

आठव्या वेतन आयोगात कर्मचारी आणि पेन्शनधारकांकडून सूचना मागवल्या आहेत. यामध्ये केंद्र सरकारचे औद्योगिक, बिगर औद्योगिक कर्मचारी, केंद्रशासित प्रदेशांचे कर्मचारी, सर्वोच्च न्यायलय, विविध मंत्रालये, सरकारी विभाग यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत. आयोगाच्या म्हणण्यांनुसार कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि अपेक्षा समजून घेण्यास मदत होईल. यामुळे शिफारसी चांगल्या पद्धतीने तयार होतील.

सूचना ऑनलाइन पद्धतीने करा सबमिट

सूचना तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने द्यायच्या आहेत. कर्मचारी 8cpc.gov.in किंवा innovateindia.mygov.in या वेबसाइटवर जाऊन हे काम करायचे आहे. यासाठी तुम्हाला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर रजिस्टर करायचा आहे. MyGov खात्यात लॉग इन करा. हे पोर्टल ३० एप्रिलपर्यंत सुरु राहिल. तोपर्यंत कर्मचाऱ्यांना आपल्या सूचना द्यायच्या आहेत.

या सूचना लक्षात घेतल्यानंतरशिफारसी तयार केल्या जातील. या शिफारसी तयार करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी दिला आहे. त्या अनुषगांने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. या शिफारसी सादर केल्यानंतर आठवा वेतन आयोग लागू केला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : भिमाशंकर मंदिर उघडण्याआधी मुख्यमंत्र्यांचा दौरा

मुंबईतून धक्कादायक बातमी! भीषण अपघातात ज्येष्ठ शिवसैनिकाने गमावला जीव; परिसरात हळहळ

Pune Fort : पुरंदरच्या शेजारी उभा आहे पराक्रम अन् शौर्याचा साक्षीदार, 'हा' ऐतिहासिक किल्ला पाहिलात का?

Monsoon Update : राज्यात हिट वेव्ह! 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; मान्सूनची प्रगती कुठपर्यंत? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Deool Band 2 Collection : आरं रं रं रं रं रं खतरनाक! मराठी चित्रपटांत 'देऊळ बंद २'चा डंका, प्रवीण तरडेंचा सिनेमा १०० कोटींपासून काही पावले दूर

SCROLL FOR NEXT