8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट; सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

8th Pay Commission Update: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आठव्या वेतन आयोगात आता कर्मचाऱ्यांसाठी नवीन वेबसाइट लाँच करण्यात आली आहे.

Siddhi Hande

आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

समिती कर्मचाऱ्यांच्या सूचना लक्षात घेणार

ऑनलाइन सूचना नोंदवण्याची संधी

केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांसाठी मोठी अपडेट समोर आणली आहे. आठव्या वेतन आयोगासाठी सरकार अॅक्टिव्ह मोडमध्ये आलं आहे. आठव्या वेतन आयोगासाठी अधिकृत वेबसाइट 8cpc.gov.in लाँच केली आहे. या वेबसाइटवरुन कर्मचाऱ्यांचे प्रक्रियादेखील सुरु झाली आहे.

आठव्या वेतन आयोगाने १८ प्रश्नांची एक प्रश्नावली तयार केली आहे. यामध्ये सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, मंत्रालय, विभाग, न्यायिक अधिकारी आणि कर्मचारी संघटनांना मत मांडण्याची परवानगी देतो.

फीडबॅक ऑनलाइन देता येणार

आयोगाने स्पष्ट केले आहे की, या सर्व सूचना फक्त MyGov प्लॅटफॉर्मवर स्विकारल्या जातील. ईमेल, पेपर आणि पीडीएफद्वारे कोणत्याही सूचना स्विकारल्या जाणार नाहीत.ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आहे.

कर्मचाऱ्यांना प्रश्नावली हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत उपलब्ध आहेत. ज्यामुळे अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना त्यांची मते मांडता येणार आहेत. यासाठी १६ मार्चपर्यंतची संधी आहे. त्याआधी कर्मचाऱ्यांनी आपल्या सूचना द्यायच्या आहेत.त्यानंतर सूचना स्विकारल्या जाणार नाहीत.

वेतन आयोगाच्या म्हणण्यांनुसार, ही प्रक्रिया पारदर्शक असणार आहे. कर्मचाऱ्यांच्या सूचना गोपनीय ठेवल्या जातील. त्यामुळे निकाल हा एकत्रित आकडेवारीनंतर सादर केला जाणार आहे. कर्मचाऱ्यांच्या सूचना लक्षात घेऊन पुढील शिफारसी तयार करण्यास मदत होणार आहे.

वेतन आयोगाचे काम काय? (8th Pay Commission Update)

२०२५ च्या शेवटी सरकारने आठवा वेतन आयोग स्थापन केला. केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे वेतन, भत्ते आणि पेन्शनचा आढावा घेण्याचे काम आयोगाकडे आहे. याचा अहवाल तयार करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी आहे. आता ही वेबसाइट सुरु झाली आहे. या वेबसाइटवरुन कर्मचाऱ्यांच्या सूचना घेतल्या जातील. या सूचनांच्याआधारे पुढील शिफारसी तयार केल्या जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद होणार? विरोधकांचा वारंवार उच्चार, थेट उत्तर देत एकनाथ शिंदेंनी विषय संपवला

पुण्यात लवकरच 'डबल डेकर ट्विन टनल'; येरवडा ते कात्रजदरम्यान होणार उभारणी, कसा आहे संपूर्ण प्रकल्प?

Vidhan Parishad Election: महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटला; भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना कोणाला किती मिळाल्या जागा?

Mishti Doi Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट घरच्या घरी बनवा गोड, मलाईदार मिष्टी दोई

Maharashtra News Live Update: पिंपरी चिंचवडमध्ये बसचालकाने दोन वाहनांना दिली जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT