केंद्र सरकारने लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आठवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केली होती. आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ होणार आहे. मात्र, घोषणा होऊन बरेच दिवस झाले तरीही अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार असा प्रश्न विचारला जात आहे.
केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना जानेवारी २०२६ पासून आठव्या वेतन आयोगानुसार पगार आणि पेन्शन मिळण्याची आशा आहे. मात्र, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
८वा वेतन आयोग लागी होण्यास उशिर का?
आठवा वेतन आयोगाबाबत सर्व प्रक्रिया सुरु आहे. परंतु यासाठी आयोगाची स्थापना करावी लागते. अजूनपर्यंत आयोहाची स्थापना केली नाही. याचसोबत Terms Of Reference देखील ठरवले नाहीये. एक्सपर्टच्या मते, जानेवारी २०२६ पासून ८वा वेतन आयोग लागू होईल की नाही याबाबत शक्यता वाटत नाहीये.
फिटमेंट फॅक्टर किती असणार? (How Much Salary Increase In 8th Pay Commission)
आठवा वेतन आयोग हा फिटमेंट फॅक्टवर अवलंबून असतो. ऐठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर वाढणार आहे. सध्या ७व्या वेतन आयोगानुसार हा फिटमेंट फॅक्टर २.५७ आहे. ज्यामुळे बेसिक सॅलर ७००० रुपयांपासून वाढवून १८,००० रुपये झाली आहे. एक्सपर्टच्या मते, फिटमेंट फॅक्टर १.९२ ते २.८६ मध्ये असू शकतो. जर फिटमेंट फॅक्टर २.८६ असेल तर बेसिक सॅलरी ५१००० पर्यंत जाऊ शकते.
महागाई भत्ता आणि पेन्शनमध्ये बदल (DA and Pension Hike Under 8th Pay Commission)
आठव्या वेतन आयोगात महागाई भत्ता आणि पेन्शनमध्येही बदल होणार आहे. सध्या महागाई भत्ता ५५ टक्के आहे. जुलैमध्ये या भत्त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर थेट आठव्या वेतन आयोगात महागाई भत्त्यात वाढ होणार आहे. याचसोबत पेन्शनमध्येही वाढ होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.