8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती असणार? तुमचा पगार कितीने वाढणार? समोर आली मोठी अपडेट

8th Pay Commission Salary Hike Update: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आठव्या वेतन आयोगासाठी फिटमेंट फॅक्टर १.९० ते १.९२ होऊ शकतो.

Siddhi Hande

आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

फिटमेंट फॅक्टर किती असणार?

पगार कितीने वाढणार?

केंद्रीय कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. आठव्या वेतन आयोगाअंतर्गत पगारवाढ ही फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते. यासाठी आठव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना केली. आयोग शिफारसी तयार करणार आहे. शिफारसी तयार केल्यानंतर फिटमेंट फॅक्टर नक्की किती असणार हे ठरणार आहे. त्यावरुन तुमचा पगार किती वाढणार हे ठरणार आहे.

फिटमेंट फॅक्टरबाबत गेल्या अनेक दिवसांपासून खूप चर्चा आहे. फिटमेंट फॅक्टर ३.२५, २.८६ आणि २.२८ होण्याची मागणी केली जात आहे. मात्र, सध्याच्या महागाईवर फिटमेंट फॅक्टर अवलंबून असणार आहे. सध्या फिटमेंट फॅक्टर १.९०- १.९२ होण्याची शक्यता आहे.

किती वाढणार पगार? (8th Pay Commission Salary Hike)

सातव्या वेतन आयोगात पगार २७ टक्क्यांनी वाढला होता. त्यांना १४.२७ टक्क्यांनी पगारवाढ मिळाली होती. त्याचसोबत आता जानेवारी २०२६ पर्यंत महागाई भत्ता ६० टक्के झाला आहे. त्यामुळे भविष्यात ८व्या वेतन आयोगासाठी पगारवाढ १८ टक्क्यांनी होण्याची शक्यता आहे. जर पगारवाढ २४ टक्के झाली तर फिटमेंट फॅक्टर जास्त असू शकतो. दरम्यान, याची शक्यता खूप कमी आहे.

फिटमेंट फॅक्टर किती होणार? (8th Pay Commission Fitment Factor)

फिटमेंट फॅक्टर हा महागाई भत्त्यावर अवलंबून असतो. महागाई वाढली तर फिटमेंट फॅक्टरदेखील वाढला जोता. जर त्यावेळी महागाई भत्ता ६० टक्के असेल तर पगार १८ टक्क्यांनी वाढू शकतो. या परिस्थितीत फिटमेंट फॅक्टर १.९० राहणार आहे. तुमच्या बेसिक सॅलरीला फिटमेंट फॅक्टरने गुणले जाते त्यानंतर नवीन पगार ठरवला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT