8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती असणार? पगार कितीने वाढणार? वाचा

8th Pay Commission Salary Hike: आठव्या वेतन आयोगातील पगारवाढ ही फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते. दरम्यान, आता फिटमेंट फॅक्टर किती होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Siddhi Hande

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती असणार?

कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार?

केंद्र सरकार दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू करतो.२०२६ जानेवारीपासून आठवा वेतन आयोग लागू झाला आहे. मागच्या वेळी २०१६ मध्ये सातवा वेतन आयोग लागू केला होता. नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा पगार वाढतो. दरम्यान, आता सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगातील शिफारसींची वाट बघत आहे. यावरुन फिटमेंट फॅक्टर ठरवला जातो. त्यानंतर पगारवाढ केली जाते.

कर्मचारी संघटनांच्या मते, महागाई आणि पगाराचा विचार करता फिटमेंट फॅक्टर ३ ते ३.२५ असावा. दरम्यान, या मागणीनंतर नॅशनल पोस्ट संघटना फेडरेशनने याबाबत अधिकृत प्रस्ताव दिला आहे.

संघटनांच्या मते, सध्याच्या पगारात सुधारणा होईल आणि कर्मचाऱ्यांना फायदा होईल. याचसोबत वर्षाला ५ टक्के इंक्रिमेंट आणि अजून चांगले भत्ते मिळण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, जर ही मागणी मान्य झाली तर पगार कितीने वाढणार ते जाणून घ्या.

कोटक इन्स्टिट्युशनल इक्विटीजच्या मते, फिटमेंट फॅक्टर १.८ टक्के असू शकते. अॅम्बिट कॅपिटलच्या मते पगारात ३० ते ३४ टक्क्यांनी वाढ होऊ शकते. फिटमेंट फॅक्टर १.८ ते २.४६ च्या मध्ये असू शकतो.

पगार कितीने वाढणार?

फिटमेंट फॅक्टर महत्त्वाची भूमिका बजावते. यामुळे सध्याची पेन्शन आणि सॅलरीत बदल केला जातो.जर फिटमेंट फॅक्टर ३.० असेल झाला तर जर तुमची सध्याची बेसिक सॅलरी १८००० आहे तर पगार ५४,००० होऊ शकतो. सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर २.५७ होता. यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार चांगलाच वाढला होता. दरम्यान, यावेळी फिटमेंट फॅक्टर २.० ते २.५ होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : 'या' ४ राशींना आज नोकरी-व्यवसायात मिळणार गुड न्यूज; वाचा तुमचे राशिभविष्य

Yoga For Acidity: सतत Acidity चा त्रास होतोय? हे १ योगासन करेल तुमच्या सगळ्या समस्या दूर

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवला जाणार

Hingoli Crime: प्रेमाची थाप मारून पळवून नेलं; नंतर प्रियकर आणि बापाने केले अत्याचार

कामोत्तेजना वाढवणारं बोगस 'कॅप्सुल' औषधचा भांडाफोड; आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली आरोग्याशी खेळ

SCROLL FOR NEXT