DA Hike Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: १ कोटी कर्मचाऱ्यांना बसणार फटका; महागाई भत्ता, HRA आणि ट्रॅव्हल अलाउंस होणार बंद? नेमकं कारण काय?

8th Pay Commission DA Hike: आठवा वेतन आयोग लवकरच लागू होणार आहे. दरम्यान, हा वेतन आयोग लागू होण्यासाठी अजून वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, आता सातवा वेतन आयोगाचा कालावधी संपणार आहे. त्यामुळे नवीन वेतन आयोग लागू होईपर्यंत महागाई भत्ता मिळणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आठवा वेतन आयोग कधी लागू होणार?

आठव्या वेतन आयोगात महागाई भत्ता बंद होणार?

सरकारने काय माहिती दिली

केंद्र सरकारने ८वा वेतन आयोग लागू करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली आहे. यासाठी त्यांनी तीन सदस्यीय समितीदेखील स्थापन केली आहे. याचसोबत टर्म्स ऑफ रेफरन्सदेखील जारी केले आहेत. यानुसार आता समिती आपल्या शिफारसी सादर करतील. या शिफारसींना दिल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होणार हे ठरवले जाते.

आठव्या वेतन आयोगात शिफारसी सादर करण्यासाठी १८ महिन्याचा कालावधी दिला आहे.२०२७ पर्यंत शिफारसी सरकारकडे दिल्या जातील. या शिफारशींना मंजुरी दिल्यानंतर पगार वाढणार आहे. दरम्यान, या सगळ्यात कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता, एचआरए आणि ट्रॅव्हल अलाउंस बंद होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी या १ जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहेत.मात्र, याबाबत शिफारसी सादर होण्यासाठी वेळ लागणार आहे. २०२७ नंतर कर्मचारी आणि पेन्शनधारकांना पगारवाढ मिळणार आहे. दरम्यान, या कालावधी कर्मचाऱ्यांना डीए, एचआरए आणि ट्रॅव्हल अलाउंट मिळणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सरकारने काय सांगितले

एक्सपर्टच्या मते, महागाई भत्ता, एचआरए आणि ट्रॅव्हल अलाउंस किंवा इतर भत्ते बंद होणार नाही. जोपर्यंत आठवा वेतन आयोग लागू होत नाही तोपर्यंत ७ व्या वेतन आयोगाअंतर्गत भत्ते दिले जातील. दर ६ महिन्यांनी महागाई भत्ता वाढतो.

पुढील १८ महिन्यात तीनदा वाझणार महागाई भत्ता

नेक्सडिगमचे पेरोल डायरेक्टर रामचंद्रन कृष्णमूर्ती यांनी सांगितले की, रिपोर्ट तयार करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी लागेल. या कालावधीत तीनदा महागाई भत्ता वाढेल. सध्या महागाई भत्ता ५८ टक्के आहे. पुढील १८ महिन्यात महागाई भत्ता ६७ होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Shopping Markets : स्वेटर, कानटोपी, मफलर; कमी पैशांत बेस्ट व्हरायटी, मुंबईतील Winter शॉपिंग मार्केट

Maharashtra Live News Update: पुण्यात १ लाख रुपयांचा नायलॉन मांजा जप्त

Maharashtra Politics: निष्ठावान राहिलो ही आमची चूक होती का? पक्षातून हकालपट्टी होताच शिवसेना नेते ढसाढसा रडले

Surya Gochar: ग्रहांचा राजा सूर्य शनीच्या नक्षत्रात करणार प्रवेश; 'या' राशींच्या घरी येणार लक्ष्मी, सोन्यासारखे दिवस होणार सुरु

Post Meal Walking Benefit: जेवल्यानंतर १० मिनिटे चालल्यावर होतात जबरदस्त फायदे

SCROLL FOR NEXT