Central government employees await DA hike announcement ahead of Holi as salary increase expectations rise Saam Tv
बिझनेस

8 व्या वेतन आयोगाआधी सरकारचं कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, होळीच्या आधी गुड न्यूज

8th Pay Commission Salary Increase Latest Update 2026: 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. होळीपूर्वी महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

Omkar Sonawane

केंद्र सरकारच्या 8व्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) शिफारस लागू होण्याची वाट कोट्यवधी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक पाहत आहेत. 7वा वेतन आयोग (7th Pay Commission) डिसेंबर 2025 मध्ये संपणार येणार असून, त्यानंतर पुढील वर्षी मार्च-एप्रिलदरम्यान 8व्या वेतन आयोगाच्या शिफारस लागू होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात (DA Hike) मोठ्या वाढीची अपेक्षा असतानाच, केरळ सरकारने आपल्या राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना होळीपूर्वीच 10 टक्के वेतनवाढीची भेट दिली आहे. महागाई भत्ता वाढल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार असून, मार्च 2026 चा पगार वाढीव डीएसह बँक खात्यात जमा होणार आहे.

केरळमध्ये DA 25% वरून 35%

केंद्रीय कर्मचारी वाट पाहत असताना, केरळमधील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) मोठी वाढ जाहीर करण्यात आली आहे. DA 25 टक्क्यांवरून थेट 35 टक्के करण्यात आला आहे. वाढीव भत्ता मार्च 2026 च्या पगारात जोडून दिला जाईल. तसेच जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांचा थकबाकी (अरिअर्स) रक्कमही पगारासोबत दिला जाणार आहे. तसेच पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्येही मार्चपासून वाढ होणार आहे.

होळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज?

केरळ सरकारने वाढ जाहीर केल्यानंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढीच्या घोषणेची अपेक्षा आहे. मागील पाच वर्षांचा पॅटर्न पाहिला तर महागाई भत्त्याची घोषणा सहसा मार्च महिन्यात करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाही केंद्र सरकार होळीपूर्वी DA/DR वाढीची घोषणा करू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

DA वाढल्यास पगार किती वाढणार?

केंद्र सरकार जानेवारी-जून 2026 या कालावधीसाठी महागाई भत्त्यात वाढ जाहीर करू शकते. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 58 टक्के महागाई भत्ता मिळत आहे. यात 2 टक्क्यांची वाढ होऊन तो 60 टक्के होण्याची शक्यता आहे. सरकार वर्षातून दोन वेळा जानेवारी आणि जुलै महागाई भत्त्यात वाढ जाहीर करते. जर 2 टक्के वाढ जाहीर झाली, तर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनानुसार त्यांच्या पगारात थेट वाढ दिसून येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, आधी गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला

Maharashtra News Live Update: राहुल गांधींच्या अमित शहांवरील आरोपांनंतर लोकसभेत गोंधळ; कामकाज दुपारी ३ पर्यंत स्थगित

चांदीच्या अंगठ्यांच्या एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स; जी बघाल ती आवडेल

Rakhi Sawant slams Kangana Ranaut: 'आधी स्वतःचं चारित्र्य पाहा'; कंगना रणौतला चुडैल म्हणत राखी सावंत भडकली

Kalyan : कल्याण हादरलं! काळा तलावात सापडला १७ वर्षीय मुलीचा मृतदेह; पोलिसांनी ३२ कॅमेरे चेक केले अन्...

SCROLL FOR NEXT