8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट, पगार अन् पेन्शन ३४ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता

8th Pay Commission Update: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा पगार ३०-३४ टक्क्यांनी वाढू शकते.

Siddhi Hande

देशातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आठवा वेतन आयोग कधी लागू होणार असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. आठवा वेतन आयोग लागू झाल्यावर कर्मचाऱ्यांना चांगला एरियर मिळणार आहे. कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे. दरम्यान, आठव्या वेतन आयोगासाठी शिफारसी सादर करण्यासाठी अजून वेळ लागू शकतो. त्यानंतर कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार हे ठरणार आहे.

कधीपासून लागू होणार आठवा वेतन आयोग? (8th Pay Commission Implementation Date)

आठवा वेतन आयोग हा १ जानेवारी २०२६ पासून लागू आहे. मात्र, प्रत्यक्षात पगारवाढ कधी येणार याची तारीख समोर आलेली नाही. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, आठव्या वेतन आयोगाचा फायदा २०२६-२७ मध्ये मिळू शकतो. कर्मचाऱ्यांना अजून काही महिने वाट पाहावी लागणार आहे.

पगारवाढीची अपेक्षा

आठव्या वेतन आयोगात चांगल्या पगारवाढीची अपेक्षा आहे. मिडिया रिपोर्टनुसार, यावेळीपगार आणि पेन्शनमध्ये ३० ते ३४ टक्क्यांनी वाढ होऊ शकते. या पगारवाढीचा फायदा १.१ कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे.यामुळे कर्मचाऱ्यांना महागाईपासून दिलासा मिळणार आहे. परंतु याबाबत अजूनही कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. शिफारसी सादर झाल्यानंतर अधिकृत घोषणा केली जाईल.

नवीन वेतन रचना कशी असेल?

कर्मचाऱ्यांची पगारवाढ ही वेगवेगळ्या मुद्द्यांवर अवलंबून असते. फिटमेंट फॅक्टर ठरवल्यानंतर कर्मचाऱ्यांची पगारवाढ निश्चित केली जाते. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मागच्या वेळीपेक्षा या वेतन आयोगात पगारवाढ थोडी जास्त मिळू शकते. दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT