8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार कसा वाढणार? वाचा सविस्तर

8th Pay Commission Salary and Pension Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लवकरच आठवा वेतन आयोग लागू केला जाणार आहे. दरम्यान, आठव्या वेतन आयोगात पगार आणि महागाई भत्ता कितीने वाढणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Siddhi Hande

आठव्या वेतन आयोग लागू होण्याची केंद्रीय कर्मचारी वाट पाहत आहेत. दरम्यान, त्यासाठी कामदेखील सुरु केले आहे. आठव्या वेतन आयोगासाठी टर्म्स ऑफ रेफरन्सला मंजुरी दिली आहे. यानंतर १८ महिन्यात शिफारसी सादर करण्यात येतील. यानंतर पगारात आणि पेन्शनमध्ये किती वाढ होणार हे ठरवले जाईल. याचसोबत महागाई भत्त्यासह इतर भत्त्यांमध्ये काय बदल होणार याबाबत माहिती दिली जाईल.

सरकारने जानेवारी २०२४ मध्ये आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली होती. दर दहा वर्षांनी आठवा वेतन आयोग लागू केला जाते. २०१६ मध्ये सातवा वेतन आयोग लागू झाला होता.त्यानंतर आता २०२६ मध्ये आठवा वेतन आयोग लागू होणार आहे.

आठव्या वेतन आयोगासाठी एक समिती स्थापन केली जाते. ही समिती सरकारच्या टर्म्स ऑफ रेफरन्सनुसार कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढायला हवा, फिटमेंट फॅक्टर, पेन्शनबाबत निर्णय घेते. कर्मचाऱ्यांचे उत्पन्न, नोकरी आणि महागाई याच्या खर्चात सुसंगत राहावे, हे यामागेच उद्दिष्ट आहे. या सर्व श्रेणींमध्ये वेतन समानता राखण्याचे कामदेखील आयोग करतो.

आयोग काय काम करणार?

आठवा वेतन आयोग सध्याच्या वेतन मेट्रिक्सचा आढावा घेईल. यामध्ये वेतन, ग्रेड पे याबाबत वेगवेगळे स्थर आहेत. यानुसार फिटमेंट फॅक्टर निश्चित केला जाईल. याद्वारे नवीन पगार ठरवला जाईल. याचसोबत आयोग घरभाडे, वाहतूक भत्ता आणि वैद्यकीय भत्त्यांचादेखील आढावा घेईल. यानुसार ते पेन्शन, पगारामध्ये सुधारणा करतील.

फिटमेंट फॅक्टर किती होणार? (8th Pay Commission Fitment Factor)

सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर २.५७ आहे. नवीन मूळ वेतन हे सहाव्या वेतन आयोगाच्या पगाराला २.५७ फिटमेंट फॅक्टरने गुणाकार करुन निश्चित करण्यात आले होते. यामध्ये मूळ वेतन दर महिन्याला १८००० निश्चित केले होते. दरम्यान, आता किमान ३.६७ पर्यंत वाढवावे. किमान वेतन २६००० ते ३९००० पर्यंत वाढवावे अशी मागणी केली जात आहे.

काही अहवालानुसार सरकार फिटमेंट फॅक्टर किमान १.८३ ते १.९२ पर्यंत ठरवू शकतो. तर कमाल अंदाज २.४६ ते २.८६ असू शकतो. याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : कांदा चिरताना तुमचे डोळे पाणावतात ? मग फॉलो करा या सिक्रेट टिप्स

Liver Detox Tips: लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी लवंगाचे पाणी ठरेल बेस्ट, तज्ज्ञांनी सांगितल्या सोप्या टिप्स

Narayana Murthy: चीनचा ९-९-६ फॉर्म्युला वापरा, आठवड्यात किती तास काम करावे?नारायण मूर्तींनी पुन्हा दिला सल्ला

दोघेही रंगाने सावळे, मग मुल गोरं कसं झालं? नवऱ्याकडून चारित्र्यावर संशय, बायकोला झोपेतच संपवलं

Mumbai Crime: मुंबईत बिल्डरवर धाडधाड गोळ्या झाडल्या, थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT