SA20 लीगचा चौथा सिझन डिसेंबरपासून; 26 डिसेंबर ते 25 जानेवारी 2026 दरम्यान रंगणार सामने

दक्षिण आफ्रिकेची प्रमुख टी 20 लीग असलेल्या एसए20 ला भारतात वाढती लोकप्रियता आणि चाहतावर्ग मिळत असल्याचा अनुभव येत आहे. मुंबईत पार पडलेल्या यशस्वी ‘एसए20 इंडिया डे 2025’ कार्यक्रमातून हे दिसून आले.
SA20
SA20saam tv
Published On

दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटमधील प्रमुख टी20 स्पर्धा म्हणजे एसए20. भारतातही या लीगचे मोठे चाहते आहेत. डिसेंबरमध्ये होणाऱ्या या स्पर्धेच्या निमित्ताने मुंबईत ‘एसए20 इंडिया डे 2025’ हा विशेष कार्यक्रम पार पडला. या सोहळ्याने लीग आणि भारतीय उपखंडातील वाढत्या नात्याला एक महत्त्वाचा टप्पा दिला आणि 26 डिसेंबर ते 25 जानेवारी 2026 दरम्यान होणाऱ्या चौथ्या सिझनसाठी तो एक भक्कम प्रारंभबिंदू ठरला.

या कार्यक्रमात लीग कमिशनर ग्रेम स्मिथ, दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज आणि विद्यमान खेळाडू फाफ डू प्लेसिस (जोबर्ग सुपर किंग्ज), डेव्हिड मिलर (पार्ल रॉयल्स), टॉम मूडी (डर्बन’स सुपर जायंट्स), हाशिम आमला (एमआय केप टाऊन) आणि मार्क बाउचर उपस्थित होते.

त्याचप्रमाणे ट्रिस्टन स्टब्स (सनरायझर्स इस्टर्न केप), अॅड्रियन बिरेल्ल (मुख्य प्रशिक्षक, सनरायझर्स इस्टर्न केप) आणि सौरव गांगुली (मुख्य प्रशिक्षक, प्रिटोरिया कॅपिटल्स) यांनी खास व्हिडिओद्वारे या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.

पहिल्या तीन सिझनमध्ये एसए20 ने भारताबाहेरील सर्वात मोठी टी 20 लीग म्हणून ओळख निर्माण केली. मजबूत फ्रँचायझी आणि प्रसारणाच्या पाठबळावर केन विल्यमसन, जो रूट, जॉस बटलर, सुनील नारायण, आंद्रे रसेल, ट्रेंट बोल्ट यांसारखे आंतरराष्ट्रीय तारे तसेच डिवाल्ड ब्रेविस, ट्रिस्टन स्टब्स, क्वेना माफाका, रायन रिकेल्टन यांसारखे दक्षिण आफ्रिकन तरुण खेळाडू या स्पर्धेत एकत्र खेळले.

लीग कमिशनर ग्रेम स्मिथ म्हणाला, “भारत सुरुवातीपासूनच एसए20 च्या प्रवासाचा केंद्रबिंदू राहिला आहे. आयपीएल मालकीच्या टीमचं पाठबळ आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. भारतीय चाहत्यांचा उत्साह आणि ऊर्जा आम्हाला प्रत्येक सिझनमध्ये प्रेरणा देते. त्यांचा सहभाग हा लीगच्या वाढीचा मुख्य आधार आहे. चौथा सिझन सादर करण्यास उत्सुक आहोत.”

SA20
T20 World Cup : पुन्हा अहमदाबादमध्येच फायनल, 2026 च्या वर्ल्डकपची ठिकाणं ठरली; भारत-पाकिस्तान सामना या शहरात

जोबर्ग सुपर किंग्जचा कर्णधार फाफ डू प्लेसिस याने सांगितलं की, “खेळाडू म्हणून आम्हाला एसए20 विषयीचा उत्साह केवळ दक्षिण आफ्रिकेतच नाही तर भारतातही जाणवतो. ही स्पर्धा स्पर्धात्मक, मनोरंजक आणि खऱ्या अर्थाने जागतिक आहे. भारतातील चाहते आमचे सामने पाहतात आणि आमच्याशी जोडलेले आहेत हे पाहून खूप आनंद होतो. इतक्या कमी कालावधीत लीगने साध्य केलेली ही मोठी कामगिरी आहे.”

पार्ल रॉयल्सचा फलंदाज डेव्हिड मिलर म्हणाला, “एसए20 ही अशी लीग झाली आहे जी चाहते खऱ्या अर्थाने स्वतःची मानतात. केप टाऊन, जोहान्सबर्ग किंवा मुंबई कुठेही असलात तरी लोक आपल्या टीमना पाठिंबा देतात. चाहत्यांशी असलेला हा संबंधच लीगचे सर्वात मोठे यश आहे. हीच गोष्ट क्रिकेटला राष्ट्रांमधील उत्सव बनवते.”

SA20
Ind vs Aus : टी २० मध्ये भारतच किंग! ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात जाऊन नमवलं, मालिका २-१ ने जिंकली

डर्बन’स सुपर जायंट्सचे ग्लोबल डायरेक्टर ऑफ क्रिकेट टॉम मूडी यांनी सांगितलं की, “एसए20 ने खेळाडू, चाहते आणि फ्रँचायझी यांना खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडले आहे. प्रत्येक सिझनमध्ये क्रिकेटची गुणवत्ता आणि त्याभोवतीचा उत्साह वाढत आहे. दक्षिण आफ्रिकेचा आत्मा आणि जागतिक क्रिकेट समुदाय यांना ही लीग एकत्र आणते, आणि भारताकडून मिळणारा वाढता पाठिंबा या कहाणीला आणखी ऊर्जा देतो.”

SA20
Rohit Sharma: 'आज मेरे यार की शादी है’ वर रोहितचा भन्नाट डान्स; नवरा-नवरी आश्चर्यचकीत, Video Viral

एमआय केप टाऊनचे प्रशिक्षक हाशिम आमलाने सांगितलं की, “उत्साह आणि चाहत्यांपलीकडे, एसए20 ही लीग तरुण खेळाडूंना शिकण्याची, जुळवून घेण्याची आणि उच्चस्तरीय स्पर्धेत भाग घेण्याची संधी देते. या प्लॅटफॉर्मवरील क्रिकेटची गुणवत्ता आणि संधी उल्लेखनीय आहे.”

SA20
Rohit Sharma: वनडे क्रिकेटबाबत BCCIची रोहित शर्माला ताकीद; वॉर्निगनंतर 'हिट-मॅन'चा मोठा निर्णय

‘एसए20 इंडिया डे 2025’ मध्ये चौथ्या सिझनसाठीचा प्रोमो सादर केला गेला. त्यात एसए20 च्या खेळाची आणि उत्साही चाहत्यांच्या उर्जेची झलक दाखवण्यात आली. चौथा सिझन जवळ येत असताना एसए20 भारताशी असलेलं आपलं नातं अधिक दृढ करण्यास सज्ज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com