

ICC T20 वर्ल्डकप हा श्रीलंका आणि भारत या ठिकाणी खेळवला जाणार आहे. दरम्यान या वर्ल्डकपसाठी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम अंतिम सामन्याचं यजमानपद मिळवण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद लवकरच या स्पर्धेचं अधिकृत वेळापत्रक जाहीर करणार आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय आणि ICC यांच्यात झालेल्या बैठकीत यंदा 2023 वर्ल्डकपच्या तुलनेत कमी शहरांमध्ये सामने खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक निवडलेल्या मैदानावर किमान सहा सामने खेळवले जाण्याची शक्यता आहे.
BCCI ने भारतातील पाच प्रमुख शहरांची यजमानपदासाठी निवड केली आहे. यामध्ये अहमदाबाद, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि मुंबई यांचा समावेश आहे. या ठिकाणच्या मैदानांवर सामने खेळवले जाणार आहेत. याशिवाय श्रीलंकेतील तीन स्टेडियम्सवरही सामने होणार आहेत. मात्र या ठिकाणांची अधिकृत घोषणा अजून करण्यात आलेली नाही.
यामध्ये आता बंगळुरू आणि लखनऊ या शहरांचा समावेश होणार की नाही याबाबतही अद्याप माहिती समोर आलेली नाही. भारत आणि श्रीलंका मिळून ही स्पर्धा आयोजित करणार आहेत.
BCCI असं स्पष्ट केलं आहे की, ICC महिला वनडे वर्ल्डकप 2025 खेळवल्या गेलेल्या शहरांचा पुरुष T20 वर्ल्डकपसाठी विचार केला जाणार नाही. त्यामुळे गुवाहाटी, विशाखापट्टणम, इंदूर आणि नवी मुंबई या शहरांमध्ये टी-२० वर्ल्डकपचे सामने खेळवले जाणार नाहीत.
ICC ने भारतीय बोर्डला सांगितलंय की, जर श्रीलंका उपांत्य फेरीसाठी पात्र ठरली तर त्यांचा सामना कोलंबोमध्येच खेळवला जाणार आहे. त्याचप्रमाणे जर पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचली तर अंतिम सामना तटस्थ ठिकाणी खेळवला जाणार आहे.
पूर्वी झालेल्या करारानुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कोलंबोमध्येच खेळवला जाणार आहे. या करारानुसार भारत आणि पाकिस्तान एकमेकांच्या देशात प्रवास न करता तटस्थ देशात सामने खेळवले जाणार आहे. हा करार चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी दोन्ही बोर्डांनी मान्य केला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.