7th Pay Commission saam Tv
बिझनेस

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना आज मिळू शकते खुशखबर, पगारात होणार घसघशीत वाढ

केंद्रीय कर्मचाऱ्यांना आज मिळू शकते खुशखबर, पगारात होणार घसघशीत वाढ

Satish Kengar

7th Pay Commission News: केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central Government Employees) कोणत्याही क्षणी आनंदाची बातमी मिळू शकते. आज म्हणजे 30 जूनच्या संध्याकाळी त्यांच्यासाठी सर्वात मोठी घोषणा होणार आहे. कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाई भत्त्याची भेट मिळणार आहे.

आज संध्याकाळी एआयसीपीआय (AICPI) इंडेक्सचे आकडे येणार आहेत. हे आकडे मे महिन्यासाठी सीपीआयचे असतील. त्यावरून डीएमध्ये किती वाढ करण्यात येईल, हे कळेल. कर्मचाऱ्यांसाठी ही घोषणा जुलै 2023 साठी असेल.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आलेल्या एआयसीपीआय ट्रेंडवरून हे स्पष्ट झाले आहे की, महागाई भत्ता प्रचंड वाढणार आहे. जुलै 2023 मध्ये कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ जवळपास निश्चित आहे. येत्या काही महिन्यांत कर्मचाऱ्यांना 42 नव्हे तर 46 टक्के दराने महागाई भत्ता (DA Hike) मिळू शकेल. (Latest Marathi News)

जुलै 2023 च्या महागाई भत्त्यात वाढीसाठी मे महिन्याचे निर्देशांक आज जाहीर केले जातील. यानंतर डीए स्कोअर किती वाढणार हे स्पष्ट होईल. गेल्या महिन्यात एआयसीपीआय निर्देशांकात 0.72 अंकांची वाढ झाली होती.

एआयसीपीआय निर्देशांकाच्या आधारे डीए वाढीचा निर्णय घेतला जाईल

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) अखिल भारतीय ग्राहक मूल्य निर्देशांकच्या (AICPI) आधारे निश्चित केला जातो. हे आकडे दर महिन्याच्या शेवटी जाहीर केले जातात. या आधारे पुढील 6 महिन्यांत होणाऱ्या रिव्हिजनपर्यंत डीए स्कोअर किती झाला हे कळते. एप्रिल महिन्यापर्यंतचे आकडे आले आहेत. यामध्ये CPI(IW) BY2001=100 मार्चमध्ये 133.3 च्या तुलनेत एप्रिलमध्ये 134.02 वर होता. यामध्ये 0.72 अंकांची मोठी झेप घेतली आहे.

दरम्यान, 7 व्या वेतन आयोगांतर्गत, कामगार ब्युरोने 4 महिन्यांसाठी एआयसीपीआय आकडे जारी केले आहेत. एप्रिलमध्ये निर्देशांक 134.02 वर होता. या आधारावर डीए स्कोअर 45.04 टक्क्यांवर पोहोचला आहे. जानेवारीमध्ये डीए स्कोअर 43.08 टक्के, फेब्रुवारीमध्ये 43.79 टक्के आणि मार्चमध्ये 44.46 टक्के होता.

आता मे महिन्याचे आकडे जाहीर होणार आहेत. जरी निर्देशांक वाढला नाही तरी डीए स्कोअर 45.45 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. याचा अर्थ असा की जुलैमध्ये जूनचे आकडे जाहीर होईपर्यंत डीए स्कोअर 45.50 टक्क्यांच्या वर असेल. म्हणजेच कर्मचाऱ्यांची डीए वाढ 46 टक्के निश्चित केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death: पोलीस दलात आत्महत्येचं सत्र काही थांबेना! ४ दिवसात ३ आत्महत्या, काय आहे कारण?

Mahalaxmi Vrat 2025 : महालक्ष्मी व्रताची तारीख, पूजा विधी, महत्व घ्या जाणून

Maharashtra Live News Update: ते वक्तव्य करून अजित पवारांकडून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न; राम शिंदेंचा आरोप

Gunfire Shooting : क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार! तिघांचा जागीच मृत्यू, आठजण जखमी

Astro Tips: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

SCROLL FOR NEXT