Moto G04s Phone Price and Specification Know in Marathi Saam Tv
बिझनेस

Moto G04s Features: 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा; Moto G04s स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमत

Moto G04s Price and Features in Marathi: Motorola ने आपला नवीन स्मार्टफोन Moto G04s लॉन्च केला आहे. कॉनकॉर्ड ब्लॅक, सनराईज ऑरेंज, सी ग्रीन आणि सॅटिन ब्लू या चार रंगांच्या पर्यायांमध्ये ग्राहक हा फोन खरेदी करू शकतात.

साम टिव्ही ब्युरो

Moto G04s Information in Marathi:

Motorola ने आपला नवीन स्मार्टफोन Moto G04s लॉन्च केला आहे. कॉनकॉर्ड ब्लॅक, सनराईज ऑरेंज, सी ग्रीन आणि सॅटिन ब्लू या चार रंगांच्या पर्यायांमध्ये ग्राहक हा फोन खरेदी करू शकतात. यातच आज आपण यांची किंमत आणि फीचर्सबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत...

याच्या डिझाइन आणि फीचर्सबद्दल बोललो तर, हा नवीन फोन या वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च झालेल्या Moto G04v सारखा आहे. असं असलं तरी अनेक बाबतीत हा Moto G04s फोन Moto G04v पेक्षा वेगळा आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Moto G04s स्पेसिफिकेशन (Moto G04s Specification)

सध्या हा फोन जर्मनीमध्ये उपलब्ध आहे. Moto G04s मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 720 x 1612 पिक्सेलच्या HD+ रिझोल्यूशनसह 6.56-इंचाचा IPS LCD डिस्प्ले मिळतो. याची स्क्रीन गोरिला ग्लास 3 संरक्षणासह येते.  (Latest Marathi News)

यामध्ये तुम्हाला परफॉर्मन्ससाठी Unisoc T606 प्रोसेसर मिळेल. जो 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह येतो. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ग्राहक याचे स्टोरेज वाढवू शकतात. हा फोन Android 14 OS वर आधारित Motorola MyUX सह येत आहे.

कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, यात 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे आणि मागील बाजूस एलईडी फ्लॅश युनिटसह 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. युजर्स याच्या दोन्ही कॅमेऱ्यांसह 30fps पर्यंत FHD रेकॉर्डिंग करू शकतात.

कंपनीने G04s मध्ये 5,000mAh बॅटरी दिली आहे. जी 15W चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी, तुम्हाला ड्युअल सिम, 4G VoLTE, Wi-Fi 802.11 ac, ब्लूटूथ 5.0, NFC, GPS, एक 3.5 मिमी ऑडिओ जॅक आणि डॉल्बी ॲटमॉस सपोर्टसह सिंगल स्पीकर देखील यात मिळेल. दरम्यान, Moto G04s च्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने सध्या याचा खुलासा केलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलचे दर वाढले की कमी झाले? वाचा तुमच्या शहरातील आजचे नवे भाव

Fasting Food : उपवासाला बनवा 'ही' खास स्मूदी, दीर्घकाळ पोट भरलेले राहील

Kitchen Hacks: घरगुती आले-लसूण पेस्ट ६ महिने ताजी ठेवायची? जाणून घ्या सोपी आणि स्मार्ट ट्रिक्स

आई-बाबा माफ करा! 'नीट'ची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या, नागपूरमध्ये खळबळ

Horoscope Today : विनाकरण कटकटी मागे लागतील, अफवा उठतील, वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT