Smartphone: दमदार फीचर अन् जबरदस्त कॅमेरासह Xiaomi 14 Ultra स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत

Xiaomi 14 Ultra: शाओमी कंपनीने आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन Xiaomi 14 Ultra लाँच केला आहे. हा हँडसेट जबरदस्त लूक आणि उत्तम कॅमेरा क्वालिटीसह लाँच झाला आहे.
Xiaomi 14 Ultra
Xiaomi 14 UltraGoogle

Xiaomi 14 Ultra Smartphone Price And Features:

शाओमी कंपनीने आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन Xiaomi 14 Ultra लाँच केला आहे. हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. लवकरच हा स्मार्टफोन भारतात लाँच केला जाणार आहे. हा हँडसेट जबरदस्त लूक आणि उत्तम कॅमेरा क्वालिटीसह लाँच झाला आहे.

Xiaomi 14 Ultra हा एक कॅमेरा सेंट्रिक स्मार्टफोन आहे. स्मार्टफोन Leica Summilux ऑप्टिकल लेन्ससह येतो. हा स्मार्टफोन जुन्या व्हर्जनच्या तुलनेत कॅमेराच्या बाबतीत अधिक चांगला आहे. यात 32MP कॅमेरा देण्यात आला आहे. (Latest News)

Xiaomi 14 Ultra स्मार्टफोनमध्ये 6.73 इंचाचा LPTO AMOLED डिस्प्ले आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. यात Quad HD रिझॉन्यूशन आहे. या स्मार्टफोनमध्ये 3000 nits ची पीक ब्राइटनेस मिळते. स्क्रिन प्रोटेक्शन करण्यासाठी Xiami Longjing चा वापर केला गेला आहे.

Xiaomi 14 Ultra स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 3 SoC चिपसेटसोबत Adreno 750 GPU देण्यात आले आहे. याचसोबत 12GB/16GB LPDDR5X RAM आणि 256GB / 512GB / 1TB UFS 4.0 स्टोरेजचे पर्याय देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन भारतात Android 14 वर काम करेल.

कंपनीचा हा स्मार्टफोन ४ व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. यात 12Gb+256 GB चे कॉन्फिगरेशन आहे. याची किंमत चीनमध्ये 6,499 CNY आहे. म्हणजेच ७५,००० रुपये आहे.

Xiaomi 14 Ultra
Post Office Scheme: पोस्टाची ही योजना करणार मालामाल, भरघोस व्याज मिळणार; कसं ते जाणून घ्या

Xiaomi 14 Ultra मध्ये Leica Summilux ऑप्टिकल लेन्सचा वापर करण्यात आला आहे. स्मार्टफोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP Sony LYT 900 sensor आहे. हा सेन्सर १ इंचाच्या साइजमध्ये येतो. स्मार्टफोनच्या सेकंडरी कॅमेर 50MP Sony IMX858 telephoto sensor आहे. जो 3.2x optical zoom सह येतो. स्मार्टफोनचा तिसरा कॅमेरा 50MP Sony IMX858 Periscope लेंस आहे. हा कॅमेरा 5x Optical zoom सोबत येतो. तर चौथा कॅमेरा 50MP Ultra-Wide-Angle लेन्स आहे. यात 32Mp कॅमेरा दिला आहे.

Xiaomi 14 Ultra मध्ये 5,300 mAh बॅटरी दिली आहे. जी 90W फास्ट चार्जिंगसह येते. या 80W वायरलेस चार्जिंग आणि 10W रिव्हर्स वायरलेस चार्जिंग दिली आहे.

Xiaomi 14 Ultra
Petrol Diesel Rate (23rd Feb 2024) : गुड न्यूज! कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण सुरुच, पेट्रोल-डिझेल स्वस्त की, महाग?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com