5 days week Work in Bank, Bank Holiday, Banking Sector SAAM TV
बिझनेस

Bank Holidays Update : दर शनिवार-रविवार बँका बंद राहणार का? '5 डेज वीक'बाबत अर्थ मंत्रालयानं नेमकं काय दिलं उत्तर?

Nandkumar Joshi

Bank saturday- sunday holiday in India :

प्रत्येक महिन्यातील दर शनिवारी आणि रविवारी बँकांना सुट्टी मिळण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ बँकांचे कामकाज आठवड्यातून पाच दिवसच सुरू राहू शकतं.

केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार, अधिकृतरित्या दर शनिवारी सुट्टी घोषित करण्याच्या मागणीचा प्रस्ताव भारतीय बँक संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भारतीय बँक संघटनेने (IBA) आठवड्यातील पाच दिवस काम (5 days Working in Bank) आणि दोन दिवस म्हणजेच आठवड्यातील प्रत्येक शनिवार आणि रविवारी सुट्टी देण्याच्या केलेल्या मागणीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी संसदेत उत्तर दिले. अशा प्रकारचा प्रस्ताव बँक संघटनेकडून देण्यात आल्याचे कराड यांनी सांगितले.

२०१५ पासून महिन्यातील दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी

२०१५ पासून भारतात बँकांना दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सार्वजनिक सुट्टी असते. 'आठवड्यातील पाच दिवस काम' असावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून बँक कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

बँकिंग क्षेत्रात लाखो कर्मचारी

आयबीए ही संघटना बँक कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करते. त्यात सार्वजनिक आणि खासगी बँका, भारतातील विदेशी बँका, सहकारी, क्षेत्रीय ग्रामीण बँक आणि सर्व वित्तसंस्था आहेत. बँकिंग क्षेत्रातून जवळपास १५ लाखांपेक्षा अधिक व्यक्तींना रोजगार मिळतं.

बँकांमध्ये आठवड्यातून पाच दिवस काम?

आठवड्यातून पाच दिवस कामकाजासंदर्भातील प्रस्ताव स्वीकारला आहे किंवा भविष्यात यावर विचार केला जाऊ शकतो, असं अर्थ मंत्रालयाकडून अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर, आठवड्यातून दोन दिवस सुट्टी दिली जाऊ शकते. मात्र, बँकांच्या दैनंदिन कामकाजाच्या वेळेत वाढ होऊ शकते. हा बदल झाल्यास लाखो बँक कर्मचाऱ्यांना लाभ मिळू शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Festival: दिवाळीला दारात तेलाचा की तुपाचा दिवा लावावा?

Maharashtra Politics : आणखी एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

SCROLL FOR NEXT