Renault Kiger Car Saam Tv
बिझनेस

405 लिटरची बूट स्पेस, 19 Kmpl मायलेज, जबरदस्त आहे Renault ची ही 5 Seater Car

Renault Kiger Car: भारतीय कार बाजारात आजकाल परवडणाऱ्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीची क्रेझ आहे. Renault Kiger ही या सीरीजमधील मोठ्या आकाराची कार आहे. याचे बेस मॉडेल 7.27 लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये उपलब्ध आहे.

Satish Kengar

Renault Kiger:

भारतीय कार बाजारात आजकाल परवडणाऱ्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीची क्रेझ आहे. Renault Kiger ही या सीरीजमधील मोठ्या आकाराची कार आहे. याचे बेस मॉडेल 7.27 लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये उपलब्ध आहे. सध्या या कारमध्ये CNG इंजिन उपलब्ध नाही.

या कारच्या टॉप मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 13.98 लाख रुपये आहे. NCAP क्रॅश टेस्टमध्ये या कारला 4 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. कंपनीने ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही ट्रान्समिशनसह ऑफर केली आहे. ऑटोमॅटिक गिअरबॉक्समुळे ड्रायव्हरला लांबचा प्रवास करताना थकवा जाणवत नाही.

इंजिन आणि पॉवर

Renault Kiger ही फाय सीटर कार आहे. ज्यामध्ये पॉवरफुल 999 cc इंजिन देण्यात आले आहे. यामध्ये कंपनी 405 लिटरची बूट स्पेस देते. कारमध्ये RXE, RXL, RXT, RXT (O) आणि RXZ असे पाच प्रकार उपलब्ध आहेत. कारमध्ये टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम उपलब्ध आहे. कारमध्ये डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आहे.

5 स्पीड गिअरबॉक्स आणि हाय मायलेज

कारमध्ये 5 स्पीड गिअरबॉक्स आहे. ही कार वेगवेगळ्या प्रकारांमध्ये 71.01 ते 98.63 bhp पर्यंतची पॉवर जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की, ही कार 19 kmpl पर्यंत मायलेज देते. कारच्या टॉप व्हेरियंटमध्ये अलॉय व्हील्स उपलब्ध आहेत.

Renault Kiger फीचर्स

या कारमध्ये 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल सिस्टम सारखे फीचर्स मिळत. तसेच यात तीन ड्रायव्हिंग मोड नॉर्मल, इको आणि स्पोर्ट्स ग्राहकांना मिळेल. याशिवाय क्रूझ कंट्रोल, वायरलेस चार्जर, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम सारखे फीचर्सही ग्राहकांना यात मिळतील. ही कार 7 मोनोटोन आणि 4 ड्युअल टोन रंगांमध्ये येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dance Viral Video: महिलांची कमाल! नऊवारी साडी नेसून महिलांनी धरला 'ही पोगरी असली' गाण्यावर ठेका;Video व्हायरल

Udhav Thackarey News : 90 हजार बूथवर गुजरातची माणसं, उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

Parenting Tips: पॅरेंटल बर्नआउटचे बळी ठरू शकतात पालक; हे आहे मुख्य कारण

Tiger Life: वाघ किती वर्षे जगतो?

Madhuri Dixit: "श्रीदेवी आणि माझं नातं..." माधुरी दीक्षित दिवगंत अभिनेत्रीविषयी स्पष्टच बोलली

SCROLL FOR NEXT