Deadline End In March, 31st March 2024 Financial Deadline Last Date
Deadline End In March, 31st March 2024 Financial Deadline Last Date Saam Tv
बिझनेस

Deadline End In March : मार्च महिना संपण्यापूर्वी ही ८ महत्त्वाची कामे पूर्ण करा, अन्यथा होईल मोठं नुकसान

कोमल दामुद्रे

Financial Deadline :

मार्च महिना सुरु झाला आणि अनेक महत्त्वाच्या कामांची यादी समोर आली. महिना संपण्यापूर्वी काही महत्त्वाची कामे न केल्यास तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो.

मार्च महिन्यात वर्षभराच्या आर्थिक (Finance) कामांची नोंद केली जाते. कारण एप्रिल महिन्यापासून नवीन आर्थिक महिनाया सुरु होतो. त्यासाठी ३१ मार्च पूर्वीच काही आर्थिक कामे लवकरात लवकर पूर्ण करा. ऑनलाइन (Online) पेमेंट (Payment) करण्यापासून ते बँकेशी संबंधित कामांपर्यंत अनेक कामे आहेत जी वेळेवर पूर्ण करायला हवी. ती कामे कोणती जाणून घेऊया.

1. आधार कार्ड

जर तुम्हाला तुमचा आधार डेटा अपडेट करायचा असेल तर तुम्ही १४ मार्चपर्यंत फ्रीमध्ये अपडेट करु शकता. यानंतर अपडेट करताना पैसे आकारले जातील. सरकारने १० वर्षे जुने आधार कार्ड अपडेट करण्यास सांगितले होते.

2. पेटीएम

आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेच्या सेवा १५ मार्चपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर पेटीएम पेमेंट्स बँकेच्या सुविधा बंद होतील. याशिवाय ग्राहकांच्या खात्यात पैसे जमा करण्यावरही बंदी घालण्यात येणार आहे. तसेच यात क्रेडिटचे व्यवहारही करता येणार नाही. यामध्ये तुम्ही फक्त तुमची जमा केलेली रक्कम काढू शकता.

3. SBI FD मध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची संधी

SBI अमृत कलशमध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची संधी ३१ मार्च २०२४ आहे. SBI च्या वेबसाइटनुसार यामध्ये ४०० दिवसांच्या या एफडीवर तुम्हाला ७.१० टक्के मिळतील. तर यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना ७.६० टक्के व्याजदर दिला जाईल.

4. SBI गृहकर्ज डिस्काउंट

SBI We care मिळणारे व्याजदर हे ७.५० टक्के आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी SBI WeCare मध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२४ पर्यंत आहे. तसेच SBI गृह कर्जावर विशेष सुट देण्यात आली आहे. ही सवलत CIBIL स्कोअर नुसार Flexipay, NRI, पगार नसलेल्या गृहकर्जांवर दिली जाईल.

5. IDBI बँक स्पेशल FD

IDBI बँक स्पेशल FD ३०० दिवस, ३७५ दिवस आणि ४४४ दिवसांच्या कालावधीसाठी साधारणत: ७.०५ टक्के, ७.१० टक्के आणि ७.२५ टक्के व्याजदर देत आहे. या FD मध्ये पैसे गुंतवण्याची अंतिम मुदत ३१ मार्च पर्यंत आहे.

6. टॅक्स सेव्हिंग डेडलाइन

जर तुम्हाला टॅक्ससाठी पैसे वाचवायचे असतील तर आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी टॅक्स वाचवण्याची शेवटची तारीख ३१ मार्च आहे. त्याआधी तुम्हाला कोणत्याही टॅक्स बचत योजनेत गुंतवणूक करावी लागेल.

7. आगाऊ कराचा चौथा हप्ता

आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी आगाऊ कराचा चौथा हप्ता भरण्याची अंतिम तारीख १५ मार्च आहे. ही तारीख आगाऊ कराचा अंतिम हप्ता भरण्याची शेवटची तारीख आहे.

8. फास्टॅग केवायसी अपडेट

जर तुम्ही ऑनलाइन फास्टॅग पेमेंट करत असाल तर केवायसी अपडेट करण्यासाठी ३१ मार्चपर्यंतची मुदत वाढवून देण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

SCROLL FOR NEXT