आधार कार्ड हे अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. प्रत्येक भारतीय नागरिकांच्या ओळखपत्रांचे काम करते. हे कार्ड महत्त्वाच्या डॉक्यूमेंटसारखे आहे. भारतीय नागरिकांना कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आधार कार्ड असणे गरजेचे आहे.
आधार कार्डचा (Aadhaar Card) वापर हा डिजिटल ओळखपत्र म्हणून देखील कार्य करते. हे महत्त्वाचे कागदपत्र हरवले तर अनेक कामे अडकून राहू शकतात. परंतु, आता आधार कार्ड हरवले तरी घाबरुन जाऊ नका. तुम्ही घरबसल्या तुमचे आधार कार्ड सहज डाउनलोड करु शकता. जाणून घेऊया आधार कार्ड डाउनलोड (Download) करण्याची संपूर्ण प्रोसेस.
आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी त्या व्यक्तीकडे आधार क्रमांक, आधार व्हर्च्युअल आयडी, नावनोंदणी आयडी, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक किंवा ईमेल आयडी यांसारख्या वैयक्तिक माहिती असणे आवश्यक आहे. ज्यांना त्यांचा आधार क्रमांक माहित असेल त्यांनी UIDAI वेबसाइट किंवा mAadhaar अॅपवरुन (Application) ई-आधार डाउनलोड करु शकता.
1. वेबसाइटवरुन ई-आधार डाउनलोड करण्याची प्रक्रिया
सर्वातआधी तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
त्यानंतर आधार डाउनलोड करा यावर क्लिक करा.
त्यात आधार क्रमांक आणि कॅप्चा प्रविष्ट करा.
नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर मिळालेला OTP भरा आणि Submit वर क्लिक करा.
याप्रकारे तुम्ही ई-आधार पीडीएफ फॉरमॅटमध्ये डाउनलोड करु शकता.
2. mAadhaar अॅपवरुन ई-आधार कसे डाउनलोड कराल?
mAadhaar अॅप तुम्ही गुगल प्ले स्टोअर किंवा Apple App Store वरुन डाउनलोड करु शकता.
अॅप उघडल्यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि बायोमेट्रिक्ससह साइन इन करा आणि नंतर माय आधार वर जा.
Download Aadhaar अंतर्गत e-Aadhaar या पर्यायावर जा.
नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर प्राप्त झालेला ४ अंकी OTP प्रविष्ट करा आणि सबमिट वर क्लिक करा.
तुमचा ई-आधार तुम्हाला PDF स्वरुपात डाउनलोड करुन मिळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.