iQOO Neo9 Pro 5G Saam Tv
बिझनेस

200MP कॅमेरा अन् AMOLED डिस्प्ले, 19 मिनिटात होतो फुल चार्ज; जबरदस्त आहेत 'हे' स्मार्टफोन्स

Best Smartphone in India: या बातमीत आम्ही तुम्हाला कशी अशा स्मार्टफोन्सबद्दल माहिती सांगणार आहोत, जे फक्त 19 मिनिटांत पूर्ण चार्ज होतात.

Saam Tv

स्मार्टफोन चार्जिंग तंत्रज्ञान खूप अॅडव्हान्स झालं आहे. ग्राहक सध्या फास्ट चार्जिंग असलेल्या फोन्सला पसंती देत ​​आहेत. तुम्हीही फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

आम्ही तुम्हाला भारतीय बाजारात उपलब्ध असलेल्या 120W फास्ट चार्जिंगसह येणाऱ्या तीन जबरदस्त स्मार्टफोन्सबद्दल सांगत आहोत. यापैकी एक फोन फक्त 19 मिनिटांत पूर्ण चार्ज होतो. या फोनची खास गोष्ट म्हणजे तुम्हाला यात 200 मेगापिक्सेलपर्यंतचा जबरदस्त कॅमेरा सेटअप देखील पाहायला मिळवणार आहे. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत...

Redmi Note 13 Pro+ (8GB+256GB)

Redmi Note 13 Pro+ फोनची किंमत Amazon India वर 26,900 रुपये आहे. या फोनमध्ये तुम्हाला 5000mAh ची बॅटरी मिळेल. ही बॅटरी 120W हायपर चार्जला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की, हा फोन फक्त 19 मिनिटांत 0 ते 100 टक्के चार्ज होतो.

यात 200 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा सोबत 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड अँगल आणि 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा ग्राहकांना मिळेल. तसेच कंपनी सेल्फीसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे. फोनमध्ये तुम्हाला 6.67 इंचाचा 3D AMOLED डिस्प्ले मिळेल. हा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनी फोनमध्ये प्रोसेसर म्हणून डायमेंशन 7200 चिपसेट देत आहे.

iQOO Neo9 Pro 5G (8GB+256GB)

iQOO Neo9 Pro 5G ची Amazon India वर किंमत 36,998 रुपये आहे. यामध्ये तुम्हाला 5160mAh बॅटरी मिळेल. ही बॅटरी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचं म्हणणं आहे की, या चार्जिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने हा फोनची बॅटरी फक्त 11 मिनिटांत 50 टक्के चार्ज होते. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन फीचरसह येतो. फोनचा डिस्प्ले 6.78 इंच आहे. हा LTPO AMOLED डिस्प्ले 144Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.

Realme GT 6T 5G (8GB+256GB)

Realme चा हा फोन Amazon वर 32998 रुपयांना उपलब्ध आहे. कंपनी या फोनमध्ये 5500mAhची बॅटरी दिली ​आहे. ही बॅटरी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन फक्त 10 मिनिटांत 50 टक्के चार्ज होतो, असं कंपनीचं आहे. या फोनमध्ये Snapdragon 7+ Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. कंपनी या फोनमध्ये जबरदस्त 8T LTPO AMOLED डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले 6000 nits च्या पीक ब्राइटनेस लेव्हलला सपोर्ट करतो. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तर यातील सेल्फी कॅमेरा 32 मेगापिक्सेल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tringalwadi Killa : ऐतिहासिक ठिकाणी फिरायला जायचंय? त्रिंगलवाडी किल्ला ठरेल बेस्ट

Karishma Kapoor: ५१ वर्षांच्या करिश्माचा काय आहे स्किन केअर सिक्रेट; जाणून घ्या

Maharashtra Politics : शिंदे गटाला भाजपकडून धक्का! शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी हाती घेतलं 'कमळ'

Mahadev Munde Case : महादेव मुंडे हत्या प्रकरणात कोणाचा हात? शिवराज बांगर यांनी केला धक्कादायक आरोप

ठाकरे बंधू एकत्र आल्याचा धसका, CM फडणवीसांनी सांगितला निवडणूक प्लान | VIDEO

SCROLL FOR NEXT