2000 Rupess Note Exchange Deadline Saam Tv
बिझनेस

2000 Rupess Note Exchange: पोस्ट ऑफिसमध्ये बदलल्या जाऊ शकतात २ हजारांच्या नोटा; आरबीआयने दिली माहिती

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

2000 Rupess Exchange Through Post Office:

देशात २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या आहेत. देशात कुठेही २ हजार रुपयांच्या नोटांमध्ये व्यव्हार होत नाही. २ हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची शेवटची तारीख उलटून गेली आहे. त्यामुळे ज्या लोकांनी २००० रुपयांच्या नोटा बदलल्या नाही आहेत. त्यांच्या आरबीआय बँकेच्या ऑफिसबाहेर रांगा लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, आता पोस्ट ऑफिसमध्ये २००० रुपयांच्या नोटा बदलल्या जाणार आहेत. (Latest News)

२ हजारांच्या नोटा अशा बदला

आरबीआयने (Reserve Bank Of India) दिलेल्या माहितीनुसार, लोक कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून (Post Office) किंवा आरबीयने दिलेल्या १९ कार्यालयांपैकी कोणत्याही कार्यालयांतून नोटा बदलू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये या नोटा जमा करुन त्या आरबीआयच्या ऑफिसमध्ये पाठवण्यात येतात. त्यानंतर २००० नोटा बदलून मिळतील.

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, ज्या लोकांना २००० रुपयांच्या नोटा बदलायचा आहेत त्यांना ऑनलाइन अर्ज दाखल करावा लागेल. त्यानंतर कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून २००० रुपयांच्या नोटा आरबीआयच्या ऑफिसपर्यंत पाठवल्या जातील. त्यानंतर या नोटा बदलून दिल्या जातील. पोस्ट ऑफिसमध्ये आणि १९ कार्यालयांमध्ये एकावेळी जास्तीत जास्त २० हजार रुपयांच्या नोटा बदलू किंवा जमा करु शकता.

२०१६ च्या नोटबंदीनंतर भारतीय चलनात २००० रुपयांचा नोटांचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसांनी या नोटा चलननातून बाद करण्यात आल्या आहेत.

Web Title: 2000 Rupess Notes Can Be Exchanged at the Post Office; Information Provided by RBI

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT