Upcoming Electric Scooter In 2024: आकर्षक लूक आणि जबरदस्त रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच होणार भारतात लाँच; पाहा लिस्ट

Upcoming Electric Scooter : देशात सध्या इलेक्ट्रिक स्कूटरची क्रेझ प्रचंड वाढत आहे. पर्यावरपूरक अशा इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी दिवसेंदिवस बाजारात वाढत आहे. यावर्षी काही इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होणार आहेत.
Electric Scooter
Electric ScooterSaam Tv
Published On

Electric Scooter To Be Launched In 2024:

देशात सध्या इलेक्ट्रिक स्कूटरची क्रेझ प्रचंड वाढत आहे. पर्यावरपूरक अशा इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी दिवसेंदिवस बाजारात वाढत आहे. बाजारात नेहमी नवनवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होत असतात. या वर्षातही काही उत्कृष्ट क्वालिटीच्या इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होणार आहेत. आज आम्ही तुम्हाला याच स्कूटरची माहिती देणार आहोत. (Latest News)

Honda Activa Electric

वाहन उत्पादनातील होंडा ही नावाजलेली कंपनी आहे. कंपनीने आता इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादनात महत्त्वाचे पाऊल ठेवले आहे. कंपनी लवकरच नवीनHonda Active Electric

स्कूटर लाँच करणार आहे. ही बाईक आकर्षक लूक आणि नवीन फीचर्ससह बाजारात लाँच होणार आहे. ही स्कूटर सिंगल चार्जमध्ये चांगली रेंज देईल,असे कंपनीने सांगितले आहे.

Suzuki Burgman electric

सुझुकी यावर्षी दुचाकी सेगमेंटमध्ये चांगल्या बाईक लाँच करतील,अशी अपेक्षा आहे. २०२४ मध्ये सुझुकीची Suzuki Burgman electric स्कूटर लाँच होणार आहे. ही नवीन स्कूटर 4kw बॅटरीपॅकसह लाँच केली जाऊ शकते. यामध्ये लिथियम आयन बॅटरी दिली जाईल.

Electric Scooter
Tech News: तुमच्या मोबाईलचं चार्जर ओरिजनल की डुप्लीकेट? भारत सरकारचं अ‍ॅप दूर करेल तुमची समस्या

Yamaha Neo Scooters

यामाहा कंपनी आता इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये एंट्री घेणार आहे. या वर्षी कंपनी Yamaha Neo Scooter भारतात लाँच करणार आहे. कंपनी यावर्षी दगोन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहे. या दोन्ही कारमध्ये BLDC मोटर आणि लिथियम आयन बॅटरी देण्यात येणार आहे.

Ather Apex 450

एथर एनर्जीची नवीन Ather Apex 450 स्कूटर ६ जानेवारीला लाँच झाली आहे. या स्कूटरची किंमत १.८९ लाख रुपये आहे. स्कूटरची प्री बुकिंग सुरू झाली आहे. या स्कूटरची डिलिव्हरी मार्च महिन्यात सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या स्कूटरची लिमिटेड एडिशन फेब्रुवारीमध्ये Ather शोरुममध्ये येईल. स्कूटरमध्ये PMSM 7Kw बॅटरी पॅक देण्यात आला आहे. ही बॅटरी 9.3 bhp पॉवर आणि 26 Nm टॉर्क जनरेट करते.

Electric Scooter
Petrol Diesel Rate (8th January): कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण, मुंबई-पुण्यात पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com