Tech News: तुमच्या मोबाईलचं चार्जर ओरिजनल की डुप्लीकेट? भारत सरकारचं अ‍ॅप दूर करेल तुमची समस्या

Mobile Charger : स्मार्टफोन दिवसभर चालू ठेवण्यासाठी फोनची बॅटरी चार्ज ठेवण्यासाठी चार्जर आवश्यक असते. मोबाईल लवकर चार्ज होण्यासाठी चार्जर चांगलं असणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही जर बनावट चार्जर वापरत असाल तुमच्या मोबाईल चार्जरचा ब्लास्ट होऊ शकतो.
Mobile Charger
Mobile Charger Social Sites
Published On

How Identify Duplicate Charger :

आजकाल सर्वांकडे स्मार्टफोन आहे. सगळ्याचे काम आता स्मार्टफोन अवलंबून राहिलयं. घरकाम असो की, कार्यालयाचे काम सर्वांची कामे स्मार्टफोनवर अवलंबून आहे. यामुळे मोबाईल दिवसभर सक्रिय असला पाहिजे यासाठी त्याची बॅटरी पुन्हा चार्ज असावी लागते. मोबाईल लवकर चार्ज होण्यासाठी चांगला चार्जर असावा लागतो. (Latest News)

जर तुम्ही बनावट चार्जर वापरला तर फोनची बॅटरी फुटू शकते. अशावेळी प्रश्न पडतो की स्मार्टफोन चार्जर खरा होता की बनावट. यामुळे आपल्या फोनसोबत येणारा चार्जर किंवा नुसता चार्जर घेतला तर तो ओरिजनल आहे की बनावट हे कसं ओळखणार हे कसं ओळखाल हे जाणून घेऊ.

स्मार्टफोन दिवसभर चालू ठेवण्यासाठी फोनची बॅटरी चार्ज ठेवण्यासाठी चार्जर आवश्यक असते. मोबाईल लवकर चार्ज होण्यासाठी चार्जर चांगलं असणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही जर बनावट चार्जर वापरत असाल तुमच्या मोबाईल चार्जरचा ब्लास्ट होऊ शकतो. आपण घाईगडबडीत चार्जर घेतला आणि त्यामुळे ब्लास्ट झाला तर स्मार्टफोनचा चार्जर ओरिजन होता की बनावट हे कसे ओळखावं?

दरम्यान बहुतेक स्मार्टफोन वापरकर्त्यांना माहिती नसेल की, भारत सरकारचे एक विशेष अ‍ॅप मोबाईल युझरला चार्जर ओरिजन आहे की डुप्लीकेट हे शोधण्यास मदत करतं. BIS CARE App तुमचं चार्जर बनावट आहे की खरं हे सहज सांगेन. ओरिजनल चार्जरवर एक विशिष्ट कोड असतो, त्यातून ते खरं आहे की बनावट हे तपासता येते. BIS CARE App वर ओरिजनल चार्जरचं नोंदणी नंबर देण्यात आलेला असतो. नोंदणी क्रमांक टाकून, निर्माती कंपनीचे नाव, उत्पादनाचे नाव, श्रेणी, मॉडेल, ब्रँड, स्थिती आणि वैधता याबद्दल माहिती या अॅपवर उपलब्ध असते.

Mobile Charger
Redmi Note 13 Pro Plus: २०० मेगापिक्सेलच्या कॅमेऱ्यासह आहेत अनोखे फिचर्स; जाणून घ्या किंमत आणि इतर खास गोष्टी

भारत सरकारचे अ‍ॅप कसे डाउनलोड कराल

भारत सरकारच्या BUREAU OF INDIAN STANDARDSचं BIS CARE App Google Play Store वर उपलब्ध आहे. अँड्राइड फोन युझर्स ३.२ एमबी या अॅपला डाऊनलोड करू शकतात. डाऊनलोड केल्यानंतर Verify R. No. Under CRS वर टॅप करावं लागेल. त्यानंतर आता चार्जरवर लिहिलेले R-xxxxxxनंबरला तेथे नोंदवून लायसेन्स डिटेल्स तपासता येतील.

Mobile Charger
OnePlus Ace 3 झटपट होतो चार्ज; जाणून घ्या भारतात कधी होणार लॉन्च, काय असेल किमत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com